आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट..

Spread the love

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट..

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे प्रतिनिधी ८ डिसेंबर.

बुधवार दि.7 डिसेंबर 2022 .तळेगाव दाभाडे. तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णाराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता पाचवी ते आठवी या विद्यार्थ्यांची एक क्षेत्रभेट करण्यात आली.

रोजच्या अभ्यासाबरोबरच आपल्या परिसरातील भौगोलिक क्षेत्राला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या अवांतर ज्ञानात भर पाडण्यासाठी या विद्यार्थ्यांना नायगाव येथील पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची “कात्रज डेअरी” व कामशेत येथील “श्रीराम राईस मिल” या ठिकाणी नेण्यात आले.

या विद्यार्थ्यांना दूध डेअरीतील सर्व उत्पादने , तसेच दुधावर केली जाणारी सर्व प्रक्रिया व साळींपासून उत्पादित केला जाणारा तांदूळ यांची सविस्तर प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आली. विद्यार्थ्यांनीही अतिशय आनंदाने त्याचा आनंद घेतला.

यासाठी संस्थेचे अध्यक्ष. संदीप काकडे यांची मोलाची मदत मिळाली. या विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर व त्यांच्या वर्गशिक्षिकाही सहाय्यासाठी होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!