आरोग्य व शिक्षणदेश विदेशमहाराष्ट्र

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका तळेगांव दाभाडे येथे आगमन..

श्रीक्षेत्र आळंदी प्रदक्षिणा। श्रीक्षेत्र अलंकापुरी पायी प्रदक्षिणा वर्ष ७२६ वा सोहळा..

Spread the love

श्रीक्षेत्र आळंदी प्रदक्षिणा। श्रीक्षेत्र अलंकापुरी पायी प्रदक्षिणा वर्ष ७२६ वा सोहळा…

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे प्रतिनिधी,१० डिसेंबर.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी नंतर नामदेव आदी संतांनी आळंदी परिक्रमा केली,त्यात तळेगांव येते त्यावेळे पासून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका तळेगांवी येत असतात,याही वर्षी मंगळवार दिनांक १३/१२/२०२२ रोजी दुपारी १\३० श्री.विठ्ठल मंदिर तळेगाव दाभाडे येथे येत आहेत,
स्वागत व पुजन , संतोष छबुराव भेगडे सदस्य पुणे महानगर नियोजन समिती यांच्या हस्ते होणार आहे.

तसेच ही परिक्रमा दिंडी भोईआळी-खडकमोहल्ला- बाजारपेठ तेली ,मारुती मंदिर, जिजामाता चौक, सुभाष चौक, विठ्ठल मंदिर-विठ्ठल मंदिर 🌹परत गणपती चौक-चावडी चौक-डोळसनाथ मंदिर -बनेश्वर मंदिर मार्गे-माळवाडी~ इंदोरी मार्गे मार्गस्थ होणार आहे.

ह्या परिक्रमेत महाराष्ट्रातील थोर संत,महंत व नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार सहभागी होत आहेत, तसेच ह.भ.प.श्री.बंडातात्या कराडकर ,हरिभक्तिपरायण ज्ञानेश्वर महाराज कदम हे बरोबर आहेत. तरी सर्व भाविकांनी  वेळेवर उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा. अशी विनंती श्री.विठ्ठल मंदिर संस्थान तळेगांव दाभाडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!