ताज्या घडामोडी

रमेश झेंडे यांना आदर्श तलाठी पुरस्कार जाहीर

Spread the love

साकुरी/ शिर्डी येथील कामगार तलाठी रमेश किसन झेंडे यांना आदर्श तलाठी पुरस्कार जाहीर झाला आहे नगर येथे १मे रोजी होणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी नगर जिल्ह्यातील महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत अहमदनगर जिल्हाधिकारी महसूल प्रशासनाने २०२२या वर्षासाठीच्या आदर्श तलाठी पुरस्काराची घोषणा केली आहे प्रमाणपत्र ५हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे कामगार तलाठी झेंडे यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे तहसीलदार कुंदन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसुली. राजशिष्टाचार व निवडणूक विषयक कामकाज उत्कृष्टपणे केले आहे त्यांनी तलाठी म्हणून काम करताना तात्काळ कामाचा निपटारा करुन जलदगतीने काम मार्गी लावणे सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी नेहमीच प्रयत्न राहीला आहे त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना आदर्श तलाठी पुरस्कार जाहीर केला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!