आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आयोजित तळे परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रकल्प रोटेरियन आणि नागरिकांच्या सहभागातून चे यशस्वीरित्या पार पडला.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी .विजयकुमार सरनाईक हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर माजी नगरसेवक अमोल शेटे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते.

Spread the love

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आयोजित तळे परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रकल्प रोटेरियन आणि नागरिकांच्या सहभागातून चे यशस्वीरित्या पार पडला.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी ११ डिसेंबर.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी .विजयकुमार सरनाईक हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर माजी नगरसेवक अमोल शेटे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे या प्रकल्पाचे नेतृत्व पर्यावरण डायरेक्टर ज्योती मुंदरगी यांनी केले तर आयोजन प्रकल्प प्रमुख रो रिषिकेश कुलकर्णी आणि सहकारी रो निलेश भोसले, रो अतुल हंपे, रो अरूण बारटके आणि रो. गुरूप्रसाद कुलकर्णी यांनी केले. तसेच उपाध्यक्ष उद्धव चितळे, सेक्रेटरी कमलेश कार्ले आदी उपस्थित होते.

रो.महेश महाजन यांनी या वेळी तलावात पुन्हा परदेशी पक्षी स्थलांतरीत  यावेत यासाठी अवैध मासेमारीवर कडक बंदी आणावी तसेच तलावाभोवती कचरा होऊ न देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या असे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना निवेदन केले. या प्रोजेक्ट मध्ये रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे मध्ये 35 सदस्य हजर होते व इतर 150 पेक्षा जास्त लोकांनी या प्रकल्पामधे सहभाग घेतला.

या प्रसंगी  यादवेंद्र खळदे,  वैशाली ताई दाभाडे यांनी मार्गदर्शन केले आणि सर्वांचा उत्साह वाढविला. राजेंद्र पोळ यांनी सूत्रसंचालन केले तर अध्यक्ष अनिश होले यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!