आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

किरीट सोमय्या यांच्यासोबतच्या फोटोचा वापर करून केलेली पोस्ट पोरवाल यांना भोवणार….

प्रकाश पोरवाल यांनी नुकत्याच वायरल केलेली नितिन अग्रवाल यांचे बाबतची एक बदनामी कारक पोस्ट पोरवाल यांना चांगलीच भोवणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Spread the love

किरीट सोमय्या यांच्यासोबतच्या फोटोचा वापर करून केलेली पोस्ट पोरवाल यांना भोवणार….

आवाज न्यूज :  मावळ प्रतिनिधी, ११ डिसेंबर.

प्रकाश पोरवाल यांनी नुकत्याच वायरल केलेली नितिन अग्रवाल यांचे बाबतची एक बदनामी कारक पोस्ट पोरवाल यांना चांगलीच भोवणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राष्ट्रीय ख्यातीप्राप्त भाजपा चे ज्येष्ठ नेते किरीट सोमैया यांच्या सोबत कुठेतरी गर्दीत घाईघाईत काढलेल्या फोटो सोबत प्रकाश पोरवाल यांनी चक्क त्यांच्या निवास स्थानी भेट घेउन लवकरच अगरवाल यांचे घोटाळे बाहेर काढू असे आश्वासन सोमय्या यांनी दिले या आशयाची पोस्ट वायरल केली आणि अग्रवाल कुटुंबियांनी या बाबत थेट सोमैया यांना याबाबत खुलासा मागीतला.

किरीट सोमैया यांनी सदर प्रकरणी जातीने लक्ष घालुन पोरवाल यांना या बाबत जाब विचारला असता सदर आरोप सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे कोणतेही पुरावे नसल्याची कबुली पोरवाल यांनी  सोमैया यांना दिली असल्याचे किरीट सोमैया यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे. एवढेच नाही तर सोमैया यांनी लोणावळा पोलीस स्टेशन येथे सुद्धा पत्र लिहून सदर बाब कळवली आहे.

असे खोटे आरोप करुन व नामवंत राजकिय पुढा-यांसोबत फोटो वायरल करुन सरकारी अधिकारी यांच्यावर दबाव तंत्र आणले जातात..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!