समाज बांधवांच्या भावनांचा आदर करत, सर्वांना सोबत घेऊन आपल्याला समाज कार्य करायचे. श्री.पंकज य.भावसार,जळगांव यांचे प्रतिपादन.
प्रतिनीधी- डॉ.सुनील भावसार
दि.५जानेवारी २०२२ रोजी नंदुरबार येथे भावसार विकास बहुउद्देशीय संस्थेचे निधी संकलन प्रमुख श्री.पंकजजी य.माळवी(भावसार) यांनी धावती भेट दिली.त्या प्रसंगी उपस्थित हिंगलाज प्रतिष्ठानचे पदाधिकारी श्री जयवंतराव धगधगे (आपत्ती निवारण समिती प्रमुख- भावसार विकास बहुउद्देशीय संस्था (रजि.) संपूर्ण भारत), प्रा.मुकेश वाडेकर, श्री.सुनिल भावसार, UBOचे नंदुरबार अध्यक्ष श्री.प्रल्हाद भावसार, श्री.संदिप भावसार. श्री.प्रफुल्ल भावसार., इंजि.प्रविण भावसार इत्यादी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. आणि शिव शंकर महादेवाच्या साक्षीने श्री.पंकज भाऊंना येणाऱ्या राज्य अध्यक्ष पदाचे निवडणूकीत भरघोस यश येवो अशा शुभेच्छा दिल्या.
तद् नंतर श्री.पंकजजी भावसार यानी नंदुरबार येथील भावसार पंच कमिटी कार्यकारिणीची सदिच्छा भेट घेतली. ह्या प्रसंगी नंदुरबार भावसार समाजाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी श्री पंकजजी भावसार यांचे सहर्ष स्वागत केले, व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळेस नंदुरबार भावसार पंच कमिटीचे पुढील मान्यवर अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.सुभाषजी भावसार (अध्यक्ष), श्री.प्रशांत भावसार (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष- भावसार युवा एकता), श्री.कैलास भावसार, श्री.प्रविण भावसार, श्री.विशाल भावसार, श्री.ईश्वरलाल भावसार. आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यात.
नंतर श्री.पंकज भावसार यांनी प्राध्यापक श्री.मुकेश वाडेकर यांच्या निवासस्थानी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. चर्चे दरम्यान समाजाचे अध्यक्ष हे लोकशाही मार्गाने निवडले पाहिजे ,समाजाचे अध्यक्ष कोण असावे हे समाजाला ठरवू द्यावे ,समाजाच्या भावनांचा आदर करावा इत्यादी महत्वपूर्ण मुद्दावर चर्चा झाली. या वेळी सर्वाना सोबत घेऊन आपल्याला समाजकार्य करायचे आहे. असे श्री.पंकज भाऊंनी प्रतिपादन केले.