आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचा इन्फी लीग मोटरस्पोर्ट समवेत सामंज्यस करार..

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचा इन्फी लीग मोटरस्पोर्ट समवेत नुकताच सामंज्यस करार करण्यात आला.

Spread the love

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचा इन्फी लीग मोटरस्पोर्ट समवेत सामंज्यस करार..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी,१३ डिसेंबर.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचा इन्फी लीग मोटरस्पोर्ट समवेत नुकताच सामंज्यस करार करण्यात आला. त्याच अनुषंगाने इन्फी लीग मोटरस्पोर्ट आयोजित अरावल्ली टेराइन व्हेईकल चॅम्पियनशिप सीझन सहाचे नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये लवकरच आयोजन करण्यात येत आहे.

या स्पर्धेमध्ये २० राज्यातील उच्च स्तरीय अभियांत्रिकीमहाविद्यालयासह ११० संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा प्रथमच महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या गाड्या या स्पर्धेमध्ये असणार आहेत. याद्वारे मार्च २०२३ मध्ये दीडशेहून अधिक कंपन्या सहभागी होऊन अभियांत्रिकी आणि डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी एनएमआयईटी महाविद्यालय आणि इन्फी लीग मोटरस्पोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पनांद्वारे गाड्यांच्या निर्मिती प्रक्रियेमधील कौशल्य तयार व्हावेत, रेसिंग कारमध्ये विविध संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठीच तंत्रज्ञान वापरले जावे, टीमवर्क आणि साहसीवृत्ती या सर्वांचा मिलाप होण्यासाठी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

या कराराप्रसंगी इन्फी लीग मोटरस्पोर्ट चे व्यवस्थापक भावीण भंडारी, चंद्रेश शर्मा, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे खजिनदार राजेश म्हस्के, नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे, डॉ. नितीन धवस, प्रा. विशालसिंग राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!