आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे व पंचायत समिती मावळ समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक दिव्यांग दिन सप्ताह” पंचायत समिती मावळ येथे उत्साहात साजरा…

जागतिक दिव्यांग दिन सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व शैक्षणिक साहित्य किट या बक्षिसांचे वितरण..

Spread the love

जागतिक दिव्यांग दिन सप्ताह, पंचायत समिती मावळ येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

♿♿♿♿♿♿♿ ♿♿♿♿♿
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी,१३ डिसेंबर..

🔹जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे व पंचायत समिती मावळ समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक दिव्यांग दिन सप्ताह” पंचायत समिती मावळ येथे उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक १२/१२/२०२२ रोजी जागतिक दिव्यांग दिन सप्ताहाची सांगता,बक्षिस वितरण सोहळा,  या कार्यक्रमाने करण्यात आली . दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी या बक्षिस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांना प्रोत्साहन देणे, जीवनाचा आनंद मिळवून देणे,आत्मविश्वास वाढविणे या उद्देशाने;  विविध कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. होते.

३ डिसेंबर २०२२ रोजी .जागतिक दिव्यांग दिन, संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र – ६ , तळेगाव दाभाडे, ता . मावळ येथे साजरा करण्यात आला. जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये मावळ तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थी , त्यांचे पालक व संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा तळेगाव चे विद्यार्थी सहभागी झाले. तसेच “वसा स्वच्छतेचा” या पथनाट्याचे, सादरीकरण केले .
💫दि. ५ डिसेंबर २०२२ रोजी गायन स्पर्धा
💫६ डिसेंबर २०२२ रोजी चित्रकला स्पर्धा.
💫७ डिसेंबर २०२२ रोजी यशस्वी दिव्यांग व्यक्तीची ऑनलाईन मुलाखत.
💫८ डिसेंबर २०२२ रोजी विविध खेळांच्या स्पर्धा
💫९ डिसेंबर २०२२ पालकांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली.

या विविध स्पर्धांमध्ये ५४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . तसेच जागतिक दिव्यांग दिन सप्ताहामध्ये पालकांनीही सहभाग घेतला.. कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन वेशभूषेतील सादरीकरण असे वेगवेगळे कलाविष्कार दाखवून उपस्थित त्यांची मने जिंकली व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले.तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी सहभागी होऊन जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे सादरीकरण केले ….

जागतिक दिव्यांग दिन सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व शैक्षणिक साहित्य किट या बक्षिसांचे वितरण, पंचायत समिती मावळचे गटविकासअधिकारी .सुधीरजी भागवत साहेब गटशिक्षणाधिकारी .बाळासाहेब राक्षे , विस्तार अधिकारी. मनोहर कुलकर्णी  सुजाता शिंदे  तसेच भाजपा अध्यक्ष वडगाव शहरचे . अनंतजी कुडे  यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच पाककला स्पर्धेतील विजेत्यांना विजेत्या पालकांनाही बक्षीस वितरण करण्यात आले.

सदर बक्षिस वितरणाचा कार्यक्रम “पंचायत समिती मावळचे गटविकास अधिकारी. सुधीर भागवत ,लायन्स क्लबचे संस्थापक  भूषण मुथ्या व विस्तार अधिकारी. सुजाता शिंदे . यांच्या सौजन्याने घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष साधन व्यक्ती शितल शिशुपाल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षक स्मिता जगताप व लता वनवे यांनी केले . तसेच आभार सौ साधना काळे यांनी केले.

सदर कार्यक्रम जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता , संपर्कप्रमुख मा.  कृष्णा फडतरे साहेब व पंचायत समिती मावळचे गटशिक्षणाधिकारी मा. बाळासाहेब राक्षे साहेब विसर अधिकारी माननीय  सुदाम वाळुंज साहेब यांच्या, मार्गदर्शनाखाली घेण्यात आला . विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..

कार्यक्रमास विस्ताराधिकारी मा. श्री कृष्णा भांगरे साहेब , केंद्रप्रमुख .सुहास धस सर यांनी विशेष सहकार्य केले .विस्तार अधिकारी मा. थोरवे साहेब यांचेही सहकार्य मिळाले.केंद्रप्रमुख मा.खरसुले, पांडुरंग डेंगळे सर, जिल्हा परिषद प्राथ.शाळा वडगाव शाळेच्या ,राजश्री घोरपडे मॅडम व समग्र शिक्षा अभियान चे विषय साधन व्यक्ती, डाटा एन्ट्री ऑपरेटर, अभियंता उपस्थित होते.

💫कार्यक्रमाचे नियोजन समावेशित शिक्षण विभागाच्या विशेष साधन व्यक्ती  शितल शिशुपाल, विशेष शिक्षक  स्मिता जगताप, सौ .साधना काळे,  सुमित्रा कचरे, शकीला शेख,  लता वनवे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!