आरोग्य व शिक्षणकृषीवार्तादेश विदेशमहाराष्ट्र

विनोदसम्राट दादु इंदुरीकर यांच्या जन्मशताब्दी निमीत्त लोकनाट्य आयोजनासह जीवनगौरव जाहीर…

विनोदसम्राट दादु इंदुरीकर यांच्या जन्मशताब्दी निमीत्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा तळेगाव दाभाडे (मावळ) व विनोदसम्राट दादु इंदुरीकर लोककला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान लोकनाट्याचे आयोजन..

Spread the love

विनोदसम्राट दादु इंदुरीकर यांच्या जन्मशताब्दी निमीत्त लोकनाट्य आयोजनासह जीवनगौरव जाहीर…

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १५ डिसेंबर.

विनोदसम्राट दादु इंदुरीकर यांच्या जन्मशताब्दी निमीत्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा तळेगाव दाभाडे (मावळ) व विनोदसम्राट दादु इंदुरीकर लोककला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान लोकनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याचबरोबर गाढवाचं लग्न या नाटकातील कलाकार प्रभा शिवणेकर व वसंत अवसरीकर यांना जीनवगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. तसेच विनोदसम्राट दादु इंदुरीकर यांच्या जन्मशताब्दी निमीत्त विनोदसम्राट दादु इंदुरीकर लोककला प्रतिष्ठानचॆ उद्घाटन देखील यावेळी होणार आहे.

हा सोहळा शुक्रवारी दिनांक १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता तळेगाव दाभाडे येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र.6 (गुलाबी शाळा) येथे पार पडणार आहे. यावेळी कलाभूषण रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य मंडळाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्य़क्ष प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी, विशेष अतिथी अभिनेत्री सविता मालपेकर, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अखिल भारतीय नराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्य़क्ष भाऊसाहेब भोईर, प्रसिद्ध किर्तनकार, ह.भ.प.पंकजमहाराज गावडे हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य संचालक सांस्कृतीक कार्य संचलनालय बिभिषण चवरे, मावळचे आमदार सुनिल शेळके, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखळकर, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, लावणी कलावंत अर्चना जावळेकर व संगिता लाखे आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन विनोदसम्राट दादु इंदुरीकर लोककला प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश खांडगे व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!