आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

रोटरी सिटीतर्फे तळेगाव भूषण व कर्तव्यदक्ष पुरस्कार प्रदान..

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्या भेटीचे औचित्य साधून तळेगाव भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच त्याच कार्यक्रमात कर्तव्यदक्ष पुरस्कार सुद्धा देण्यात आला.

Spread the love

रोटरी सिटीतर्फे तळेगाव भूषण व कर्तव्यदक्ष पुरस्कार प्रदान..

आवाज न्यूज : रेशमा फडतरे,  वार्ताहर तळेगाव दाभाडे, १६ डिसेंबर.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्या भेटीचे औचित्य साधून तळेगाव भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच त्याच कार्यक्रमात कर्तव्यदक्ष पुरस्कार सुद्धा देण्यात आला. एमरोल्ड रिसॉर्ट या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमात डॉ  मीनल कुलकर्णी,ऍड विनय चंद्रकांत दाभाडे व श्री संदीप पानसरे यांना तळेगाव भूषण तर सर्पमित्र भास्कर माळी यांना कर्तव्यदक्ष पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ  मीनल कुलकर्णी या B. Sc.maths असून सृजन नृत्यालयाच्या संस्थापक आणि  संचालिका,कलापिनी व सेवाधाम वाचनालयाच्या कार्यकारिणी सदस्य,श्रीरंग कलानिकेतन च्या केंद्र प्रमुख अशी विविधा संस्थांची जबाबदारी सांभाळत आहेत.सृजन नृत्यालयाची स्थापना करुन गेली २७ वर्षे तळेगाव व मावळ परिसरात नृत्य शिक्षण देण्याचे कार्य करत आहे.

ॲड. विनय चंद्रकांत दाभाडे, निर्माते दिग्दर्शक असून स्वातंत्र्याच्या इतिहासावर सशस्त्र क्रांतीवर भाष्य करणारे 950 वर्षाचा इतिहास सर्वांसमोर स्वातंत्र्यसमर या महानाट्याच्या माध्यमातून त्यांनी साकारला.संदिप दत्तात्रय पानसरे हे वृद्धाश्रमासाठी , मूठभर धान्य आजी-आजोबांना” हा उपक्रम शाळां-शाळांमध्ये राबविणे.दिव्यांग-मतिमंद मुलांना मदत करणे.ऊस वाहतूक करणाऱ्या टायर बैलगाडीला ब्रेकचे संशोधन करून अमलात आणले.त्यातुन बैल व गाडीवाल्याचा त्रास खूप कमी झाला.असे विविध उपक्रम आपली नोकरी सांभाळून करीत असतात. या कार्यची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित केले.

भास्कर ज्ञानू माळी मामा हे गेली दहा ते पंधरा वर्षे तळेगाव मध्ये सर्पमित्र म्हणून काम करत आहे तसेच वन्यजीव रक्षक मावळ या टीम मध्ये पण काम करतात सापांची संपूर्णपणे माहिती व त्याचे प्रशिक्षण त्यांना आहे आतापर्यंत सात हजार सापांना जीवदान दिलेले आहे तसेच रेस्क्यू टीम मध्ये पण काम करतात म्हणून त्यांना कर्तव्यदक्ष पुरस्कार देण्यात आला आहे.

याप्रसंगी बोलताना रो डॉ अनिल परमार यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीने कायमस्वरूपी नागरिकांच्या हिताचे प्रकल्प राबवावेत व त्याला डिस्ट्रिक्ट कडून पूर्णपणे सहकार्य केले जाईल तर रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या कार्याचे व अध्यक्ष रो दीपक फल्ले यांनी केलेल्या कामाचे कौतुक डॉ रो अनिल परमार यांनी केले.

याप्रसंगी असिस्टंट गव्हर्नर रो मंगेश गारोळे,रो विलास काळोखे, गोपाळे गुरुजी क्लब ट्रेनर रो दिलीप पारेख माजी अध्यक्ष रो संतोष शेळके व रो संजय मेहता हे उपस्थित होते रोटरी सिटीच्या वतीने रो अनिल परमार यांच्या हस्ते सेवाधाम ग्रंथालयास पुस्तकांचा संच भेट देण्यात आला..

अध्यक्षीय मनोगतामध्ये दीपक फल्ले यांनी रोटरी सिटीच्या माध्यमातून तळेगाव शहर व पंचक्रोशीतील गोरगरीब, दिन दुबळ्या समाजाची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते हे आमचं भाग्य आहे असे मनोगत व्यक्त केले.
रो सुरेश शेंडे यांनी सेक्रेटरी रिपोर्टचे वाचन केले तर रो मंगेश गारोळे व रो दिलीप पारेख यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी सहा नवीन सदस्यांनी रोटरी सिटी चे सभासदत्व ग्रहण केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो मिलिंद निकम यांनी तर पुरस्काराचे वाचन रोटरियन भगवान शिंदे यांनी व आभार प्रदर्शन रो शाईन शेख यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन रो किरण ओसवाल, रो प्रशांत ताय,रो संजय वाघमारे,रो रेश्मा फडतरे, रो शरयू देवळे व सर्व रोटरी सदस्यांनी केले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!