ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

लॉकडाऊन ची भीती खरी की खोटी ?

काही भीती पसरवणाऱ्या लोकांनी ही आपली जवाबदारी ओळखली पाहिजे .इतकेच सुज्ञ सरकार आणि प्रशासन  लवकरच काय तो निर्णय घेतील .

Spread the love

लॉकडाऊन ची भीती खरी की खोटी ?

आवाज न्यूज : हर्षल विनोद आल्पे. तळेगाव दाभाडे ,२५ डिसेंबर.. 

सध्या टीवी वर बातम्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या बातम्या सुरु झाल्या आहेत. काही बातम्या देणारया वाहिन्यांनी तर लवकरच लॉक डाऊन होणार असे आधीच जाहीर ही केले आहे.

यां बातम्या बघितल्या कि भीती वाटते, २०२० सारखे पुन्हा तेच होणार असेल तर आपले नागरिक म्हणून काय होणार ? हा प्रश्न अनेकांना पडलाय. काही लोक आत्ताच याच चिंतेत घराच्या बाहेर पडायला ही घाबरत आहेत. विशेषत: जेष्ठ नागरिक, ते तर भेदरलेले आहेत. सध्या असे ही काही लोक आहेत, ज्यांची मुले व्यवसायासाठी/नोकरीसाठी इतर ठिकाणी अथवा परदेशात असतात. अशा वेळी ते एकटे असलेले स्वतंत्र राहात असलेले जेष्ठ नागरिक यांना भविष्याची चिंता तर वाटतच आहे, पण त्याहून जास्त आपल्या एकटेपणाची अशावेळेला जास्त भीती वाटते . त्यांचा विचार कुणी करतंय का या समाजात ? सहज बातमी देणे सोपे आहे.की, माननीय केंद्र सरकार पुन्हा एकदा आपल्या देशात लॉकडाऊन चा विचार करत आहे . पण, परिणाम काय होतील ? विचार करा, एकदा.

अजून ही आम्ही २०२० च्या लॉकडाऊन मधून सावरत आहोत. आमचे कामधंदे आता कुठे सुरु होत आहेत. काही ठिकाणी तर आम्ही चांगले स्थिरस्थावर होत आहोत . आम्ही आमच्या स्वप्नांच्या अगदी जवळ आहोत. आणि पुन्हा आता लॉकडाऊन ची भीती?

एकदा च काय ते, कायम चा जालीम उपाय करा , मान्य आहे तो तुम्ही शोधत ही आहात, पण मग या भीती दाखवणारया काही माध्यमांना सज्जड दम का देत नाही ? कि, लोकांना असे घाबरवू नका, उगाचच भीती दाखवण हा गुन्हा आहे, तो तुम्ही करू नका, सरकारने ठणकावून सांगितले पाहिजे, की, आम्ही योग्य उपायोजना करीत आहोत. शक्यतो, लॉकडाऊन ची वेळ येणार नाही अशापद्धतीने आम्ही विचार करीत आहोत. आणि तरीही काही माध्यम चीन च्या कुठल्या कुठल्या चित्रफिती दाखवून जर भीती पसरवतच राहतील तर मात्र सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. कारण आम्ही तयार आहोत, सरकारने सांगितलेले ऐकायला आणि मास्क घालायला, पण ! आम्ही आताही लॉकडाऊन साठी आताही तयार नाही आहोत, एवढे मात्र खरे , बाजारांमध्ये, रस्त्यात, इतरत्र स्टेशन सारख्या सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या लोकांशी बोलल्यावर हेच लक्षात येते कि, लोक तयार नाही आहेत लॉकडाऊन साठी ! त्यांना नकोय ते संकट, होय संकटच!!!!

आपली काम सोडून घरी बसणे हे प्रत्येकालाच शक्य नाहीये, ज्याची रोजीरोटीच घराच्या बाहेर पडून तयार होते. तो घरी बसला/बसली तर कस चालेल ?

आपण ही उगाचच गर्दी करू नये, हे मान्य, ते आपण करायला नकोच, आपण मास्क लावला पाहिजे आणि आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. हे सगळ आपणच नागरिक म्हणून पाळले पाहिजे, ते आपले कर्तव्य आहे. आपणच आपल्याला जपणे जमलेच पाहिजे. पण या काही भीती पसरवणाऱ्या लोकांनी ही आपली जवाबदारी ओळखली पाहिजे .इतकेच सुज्ञ सरकार आणि प्रशासन  लवकरच काय तो निर्णय घेतील .फक्त आपण आदर्श नागरिक होऊन  आपली काळजी घेतली पाहिजे.आणि आपण घाबरले नाही पाहिजे ,तर या संकटाचा धीराने सामना केला पाहिजे .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!