महाराष्ट्र

कार्ला ग्रामपंचायतीच्या नवीन स्मशानभूमिचे काम प्रगतीपथावर ; आमदार सुनिल शेळके यांचेकडून भरीव मदत..!

मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचेकडून सुमारे दहा लाख निधी प्राप्त झाल्याने परिसराला सुरक्षा भिंतीचे काम त्यातून करण्यात येत आहे.

Spread the love

कार्ला ग्रामपंचायतीच्या नवीन स्मशानभूमिचे काम प्रगतीपथावर ; आमदार सुनिल शेळके यांचेकडून भरीव मदत..!

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, २८ डिसेंबर.

कार्ला ग्रामपंचायतीच्या नवीन स्मशानभूमिचे काम प्रगतीपथावर असून या कामाकरीता आमदार सुनिल शेळके यांचेकडून भरीव मदत जाहीर करण्यात आल्याने लवकरच एक अत्याधुनिक स्मशानभूमि लोकांच्या सेवेत येणार , असे ग्रामपंचायतीचे कार्यालयातून समजले. दलदल आणि पाण्याची पातळी वाढत असल्याने या जागेवर सुमारे शंभर डंपर डबर देणार , असल्याचे आमदार.शेळके यांचेतर्फे जाहीर करण्यात आले.

कार्लाचे भाग्यविधाते व मान्यवरांचे दशक्रियाविधी प्रसंगामधे जाहीर कार्यक्रमामधे तत्कालीन आमदार , खासदार , माजी आमदार , दोन जिल्हापरिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य , तसेच जिल्हापरिषद कृषि विभाग सभापती तसेच कार्ला ग्रामपंचायतीचे वतीने या स्मशानभूमिचे कामासाठी निधी जाहीर झाला होता.तत्कालीन सरपंच .आश्विनीताई सागर हुलावळे यांचे काळात जाहीर झालेला हा निधी काही प्रमाणात ग्रामपंचायत कार्लाला प्राप्त झाला. काम धिम्या गतीने अतिवृष्टीमुळे  सुरू होते..दिवाळीनंतर काम वेगात सुरू आहे.

या स्मशानभूमिचे परिसरात दलदल आणि जास्त पाणी साचते , त्यामुळे सुमारे शंभर डंपर डब रदेण्याचे मावळचे आमदार सुनिल शेळके यांचेकडून जाहीर करण्यात आल्याचे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एस.जी.धोञे यांचेकडून समजले.चालू असलेल्या कामाकरीता जिल्हा परिषदेच्या निधीतून शवदाहिनीसह स्मशानभूमि कामासाठी सुमारे सहा लाख निधी प्राप्त झाल्याने ते काम प्रगतीपथावर आहे. येथृ बीडाची उत्तम स्मशानभूमी शवदाहिनी बसविण्यात येणार आहे.

स्मशानभूमिचे निवारा शेडसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने तीन लाख निधी , येथील रस्त्याचे कामाकरीता तत्कालीन आमदार यांचेकडून निधी मिळाला आणि मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचेकडून सुमारे दहा लाख निधी प्राप्त झाल्याने परिसराला सुरक्षा भिंतीचे काम त्यातून करण्यात येत आहे.

कार्लाच्या सरपंच  .दिपाली दिपकशेठ हुलावळे , उपसरपंच किरणशेठ हुलावळे , ग्रामपंचायतीचे सदस्य , सदस्या यांचेकडून या कामाचा पाठपुरावा करण्यात येत आसल्याने माजी पंचायत समिती सदस्य दिपकशेठ हुलावळे यांचे नेतृत्वाखाली हे काम प्रगतीपथावर असून आमदारनिधीमधून भरीव काम करण्यात येत आसल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.या ठिकाणी पार्कींग , स्वच्छतागृह आदी कामेही करण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक.धोञे म्हणाले. …

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!