महाराष्ट्र

श्री एकविरा देवस्थानचे माजी विश्वस्त , विलासराव कुटे यांचा शेवट ,संत कान्होपाञाप्रमाणे मंदिरात.

श्री एकविरा देवस्थानचे माजी विश्वस्त , विलासराव कुटे यांचा शेवट ,संत कान्होपाञाप्रमाणे मंदिरात देवीचे चरणी विलीन झाला .कान्होपाञा हीस पांडुरंग परमात्मा याने आपल्या चरणी विलीन करून घेतले.

Spread the love

श्री एकविरा देवस्थानचे माजी विश्वस्त , विलासराव कुटे यांचा शेवट ,संत कान्होपाञाप्रमाणे मंदिरात :

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, ४ जानेवारी,२०२३.

श्री एकविरा देवस्थानचे माजी विश्वस्त , विलासराव कुटे यांचा शेवट ,संत कान्होपाञाप्रमाणे मंदिरात देवीचे चरणी विलीन झाला .कान्होपाञा हीस पांडुरंग परमात्मा याने आपल्या चरणी विलीन करून घेतले. एक आदर्श बाप कसा आसावा ,तर तो विलासराव मधुकर कुटे यांचेसारखा ! विलासराव यांनी बर्फ विकला , फुले विकली , सायकल वरून प्रवास केला.कष्टाने सारे मिळवले , ते मुलामुलींचे साठी ! ! त्यांचे भाऊ , बहिणी , आई , वडील,कन्या आणि मुलाला अपार दुःख झाले आहे, यातून सावरण्याची शक्ती विलासराव यांचे कुटूंबास मिळावी , अशी एकविरा आणि पांडुरंग चरणी प्रार्थना करतो,असे जेष्ठ कीर्तनकार शंकरमहाराज शेवाळे यांनी किर्तनात सांगितले.

श्री एकविरा देवस्थानचे विश्वस्थ व माजी सहखजिनदार , कार्ला विकास सोसायटीचे चेअरमन , माजी ग्रामपंचायत सदस्य कै.विलासराव मधुकर कुटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित वेहेरगाव येथील श्री भैरवनाथ मंदिरासमोर आयोजित कीर्तनात ह.भ.प.शेवाळे महाराज बोलत होते.यावेळी त्यांना मृदूंगसम्राट गंभीर महाराज आणि सःतोष महाराज घनवट यांनी साथ दिली. यावेळी गायनाचार्य व कीर्तनकार तुषारमहाराज दळवी , खरात महाराज , आनंता शिंदे महाराज यांनी साथ दिली.

यावेळी कीर्तनात महाराजांनी सांगितले , एका पेशंटने एका डाॕक्टरांच्या मालमत्ता पाहून त्याला विचारले , डाॕक्टर साहेब आपण सर्वात सुखी आहात का ?  तो म्हटला नाही , मला सुखी माणसाचा सदरा हवाय ! ते दोघेही शोधायला एका खेड्यात निघाले. तेथे अर्धे अधिक शेताचे वावर नांगरणी केलेला शेतकरी बैल पाणी पाजून चारायला सोडून त्याने विहिरीत उडी मारून आंघोळ केली.त्याने भाकरी , कांदा , ठेचा सोडून बांधावर बसून जेवणाचा आस्वाद घेतला.सदरा काढून चपला उशाला घेतल्या व क्षणामधे तो झोपी गेला.
त्याला या लोकांनी विचारले , अहो दादा तुम्हाला क्षणात झोप येते , तुमचा सदरा द्या..तो म्हटला , मला सदरा असता , तर मी कशाला काम केले असते..? ?

लोकहो बाप कसा असतो , जो मुलाला हवे ते कपडे घेवून देतो , स्वतः माञ फाटकी कपडे घालतो ! !
मुलीच्या लग्नात जो अश्रू डोळ्यात येऊ देत नाही.कोपऱ्यात बसतो ! तो बाप असतो.यावेळी शेवाळे महाराज यांचा सत्कार पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पांढारकर व श्री एकविरा देवस्थानचे माजी अध्यक्ष ,माजी आमदार अनंत तरे यांचे सुपुञ जयेश तरे यांचे हस्ते शाल , स्मृतिचिन्ह विठ्ठल रूक्मिणी मुर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मान्यवरांचा सत्कार राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दिपकशेठ हुलावळे , माजी जिल्हापरिषद सदस्य.मराठे , माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर , भाजप चे प्रांतिक सरचिटणीस जितेंद्र बोञे , एकविरा देवस्थानचे माजी खजिनदार नवनाथ देशमुख , माजी विश्वस्त मदनशेठ भोई , माजी आमदार अनंत तरे यांचे सुपुञ जयेश तरे , विद्यमान सेक्रेटरी संजय गोविलकर , राष्ट्रवादीचे युवकचे तालुकाध्यक्ष किशोर सातकर आदी मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. यावेळी कै. श्री .विलासराव कुटे यांचे वडील मधुकर कुटे, मुलगा ओम कुटे, बंधू संतोष कुटे , तानाजी कुटे , राष्ट्रवादीचे नाणेमावळ अध्यक्ष बाबाजी कुटे , शिवाजी कुटे आणि मनसे तालुका विद्यार्थी सेना संघटक आशोक कुटे , तसेच शेकडो ग्रामस्थ , पंचक्रोशितील मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!