आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जैन इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत मावळात प्रथम..

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आल्या. यामध्ये जैन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर विशेष प्राविण्य मिळवून गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा कायम ठेवून अद्वितीय यश प्राप्त केले आहे..

Spread the love

जैन इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत
मावळात प्रथम.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, ५ जानेवारी, २०२३.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आल्या. यामध्ये जैन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर विशेष प्राविण्य मिळवून गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा कायम ठेवून अद्वितीय यश प्राप्त केले आहे.

प्रत्येक वर्षी गुणवत्ता यादीत जैन इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी नेत्रदीपक यश संपादित करून शाळेचे नावलौकिक द्विगुणीत करत आहेत.

यावर्षी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु. तनिष्का सोनू सातकर हिने मावळ तालुका शहरी विभागातून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली तर जिल्हास्तरावर ५९ वा क्रमांक संपादित केला. कु.गिरीजा विनय सोरटे हिने मावळ तालुक्यात चौथा क्रमांक तर जिल्हास्तरावर २७७ वा क्रमांक पटकावला. तसेच कु. आर्यन चांगदेव येवले हा तालुकास्तरावर दहाव्या क्रमांकाने यशस्वी होऊन त्याने जिल्हास्तरावर ४२० वा क्रमांक संपादित केला. तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत हर्षिता उमेश गवळी मावळ तालुक्यात प्रथम क्रमांकाची तर जिल्हास्तरीय ३४ व्या क्रमांकाने यशस्वी झाली. कु. चिन्मय विनीत जोशी हा तालुका स्तरावर द्वितीय तर जिल्हास्तरातून ५३ व्या क्रमांकाचा मानकरी ठरला. कु. प्रांजल अविनाश माळी हि तालुक्यामध्ये तृतीय तर जिल्ह्यातून ७० व्या स्थानावर यशस्वी झाली. कु. अनन्या उदय भेगडे मावळ तालुक्यात पाचवा क्रमांक संपादित करून तसेच जिल्ह्यामध्ये १७४ व्या नंबराने यशस्वी झाली. कु. आदिती दत्तात्रय लकडे हिने देखील तालुका स्तरावर सातव्या क्रमांकाने तर जिल्हा स्तरावर २३१ वा क्रमांक प्राप्त करून उत्तीर्ण झाली. कु. हर्षवर्धन संजय फासे याने मावळत आठवा तर जिल्हास्तरावर ४०० वा क्रमांक संपादन करून यश मिळवले तसेच साहिल मनीष जाधव याने मावळात ९ वा क्रमांक व जिल्ह्यामध्ये ४०९ वा क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला.

सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रमातून प्राविण्य मिळवून तळेगाव तसेच मावळ तालुक्यात सर्व स्तरावर मनाचा तुरा रोवून जैन इंग्लिश स्कूलला नेत्रदीपक यश मिळवून दिले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका. विजया शिंदे तसेच. विपुल भुसारे ( तज्ञ मार्गदर्शक ) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

गरुडझेप घेउन यश संपादित केलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे अभिनंदन शाळेचे संचालक मंडळ, तिन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका व शिक्षक वृंदाने केले. जैन इंग्लिश स्कूल सदैव अशीच यशस्वी वाटचाल करत राहील अशी शुभेच्छा संचालक मंडळाने देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!