आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताताज्या घडामोडी

आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी करिअर व्याख्यान :

रोटरी क्लब ऑफ तळेगाव (एम.आय.डी.सी. )व सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स, तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने "विद्यार्थी करिअर व्याख्यान" आयोजित करण्यात आले होते.

Spread the love

आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी करिअर व्याख्यान.. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. व सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स, तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “विद्यार्थी करिअर व्याख्यान” आयोजित करण्यात आले होते.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी १३ जानेवारी.

12 जानेवारी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती “राष्ट्रीय युवक दिन” याचे औचित्य साधून महाविद्यालयात ईयत्ता. अकरावी कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख व्याख्याते. अरविंद पर्बत सहाय्यक कमांडंट यांनी विद्यार्थ्यांनी आपल्याला आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल तर आपले ध्येय निश्चित करायला हवे. त्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी कमिटमेंट, फोकस आणि स्मार्ट वर्क करणे किती गरजेचे आहे हे त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.तसेच सर्वांनी डोळे उघडे ठेवून स्वप्न पहा.तसेच आपल्यातील कमतरता कशा दूर करायच्या, हे स्वतः ओळखा.

तसेच पोलीस फोर्स मध्ये कोणकोणत्या नवीन संधी उपलब्ध आहेत हे त्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले. श्रीकांत रेड्डी (उपकमांडेड ) यांनी सी. आर.पी.एफ. मध्ये कोणत्या नवीन वाटा विद्यार्थ्यांना खुणावत आहेत. तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी कसा करावा, हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी मार्गदर्शनातून सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. विन्सेट सालेर यांनी केले महाविद्यालयाचे प्राचार्य. संजय देवकर, रोटरी क्लब डायरेक्टर रो. दशरथ जांभुळकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव रो.यादवेंद्र खळदे , सी आर पी एफ चे कॉ.  विनोद परीट,  बबन बाबर,  सी.आर बंजारे, हवालदार. एन बालागन असिस्टंट गव्हर्नर रो. शंकर गौडा हदीमणी, डायरेक्टर रो. रवी दंडगव्हाळ, रो. दशरथ जांभुळकर, रो. युवराज पोटे, रो. संतोष मालपोटे, रो. अनिल धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वृंद, सेवक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा. मनाली पिंगळे यांनी केले तर आभारप्रदर्शन इ.अकरावी कला शाखेच्या कु.सानिका कडूसकर हिने केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!