आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

 पाटणच्या श्रीवाघेश्वरी देवीचे उत्सवात नामवंत मल्लांची हजेरी; पाटण मळवली रस्ता अरूंद असल्याने वाहणांच्या  रांगाचरांगा ..

पाटणच्या श्रीवाघेश्वरी देवीचे उत्सवात नामवंत मल्लांची हजेरी लावली.अनेक कुस्त्या बरोबरीत सोडवून काही कुस्त्या चितपट झाल्या.;

Spread the love

 पाटणच्या श्रीवाघेश्वरी देवीचे उत्सवात नामवंत मल्लांची हजेरी; पाटण मळवली रस्ता अरूंद असल्याने वाहणांच्या  रांगाचरांगा ..

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, १४ जानेवारी.

पाटणच्या श्रीवाघेश्वरी देवीचे उत्सवात नामवंत मल्लांची हजेरी लावली.अनेक कुस्त्या बरोबरीत सोडवून काही कुस्त्या चितपट झाल्या.; पाटण मळवली रस्ता अरूंद असल्याने वाहतूकीचे तीनतेरा वाजले.अखेरची मानाची कुस्ती ५१ हजाराची , सरपंच प्रविण तिकोणे यांनी बक्षिस जाहीर केलेली हनुमान आखाडा मधील पैलवान विजय कोळेकर यांनी जिंकल्याचे सरपंचांनी सांगितले.

पहिल्या दिवशी श्री वाघेश्वरी देवीच्या पालखीची दुधिवरेतील श्री हनुमान ढोलताशा पथकाचे ढोलताशांचा दणदणाटात व टाळमृदूंगाचे तालात मिरवणूक काढण्यात आली. ग्रामपंचायत सादस्य विजय शि.तिकोणे यांचेतर्फे ढोलताशा पथक आणण्यात आले. सकाळी देवीचा अभिषेक व पूजा करण्यात आली. दुपारी शिवाजीनगर येथील श्रीशिवाजीराजे मर्दानी आखाडा झाला.

ता.१२ रोजी राञी कल्हाट येथील श्री तासुबाई भजनी भारूडाचा कार्यक्रम झाला. रक्तात रंगली महाशिवराञी निमित्त अर्थात पुञाचे बलीदान . ता.१३ रोजी सकाळी हजेरीचा वग झाला. शेरास सव्वाशेर आर्थात धडाला शीर लावले कोणी ?
सध्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धैचे वारे असल्याने व कोरोना चे निर्बंध नसल्यामुळे तसेच शुक्रवारी ता.१३ भरघोस बक्षिसे घोषित केल्याने कुस्ती चा आखाडा नामवंत पैलवानांनी गाजला. यावेळी नामवंत पैलवानांनी रूपये ११ हजार , रूपये ३१ हजार व रूपये ५१ हजाराचे कुस्तीसाठी हजेरी लावून रोख इनाम पटकावले. तसेच चांदीचे गदा पटकावण्यासाठी ते बक्षिसाचे मानकरी झाले. प्रथम क्रमांकाला सरपंच प्रविण तिकोणे यांनी ५१ हजाराचे बक्षिस व ग्रामस्थांतर्फे पाटण केसरी गदा हनुमान आखाडाचा पैलवान नितीन कोळेकर याने पटकावली .याने मामासाहेब मोहोळ तालमीमधील पैलवान रोहीत चव्हाण वर मात केली.

माजी उपसरपंच कै.शाहुबाई मारूती कोंडभर यांचे स्मरणार्थ पांडुरंग मारूती कोँडभर व भगवान मारूती कोंडभर यांचेतर्फे ३१ हजाराचे बक्षिस असलेली कुस्ती मामासाहेब मोहोळ तालमीचा पैलवान मंदार ओवळे व हनुमान आखाडाचा पैलवान रितेश धरपाळे यांचेमधे झाली. यात रितेश धरपाळे किरकोळ जखमी झाल्याने दुसऱ्या मल्लाबरोबर कुस्ती लावली गेली.याआधीची एक रंगतदार कुस्ती दोन्हीही पैलवानांनी कसून सराव केल्याने निकाली न झाल्याने बरोबरीत सोडवण्यात आली.

  • लोणावळा ग्रामिणचे पोलिसनिरिक्षक किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली दोन पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
    यावेळी घरोघरी शेकडो किलो मटन , चिकन चा फडशा पाडला. तर काही घरामधे गोडधोड व्हेज जेवणाचा आस्वाद पाहुण्यांनी घेतला. पाटण , सुदामनगरीमधे काही ठिकाणी शेताशेतातून दारू पार्टीचे कार्यक्रम दिसून आले. शेकडो बाटल्या रिकाम्या झाल्या. काही लोक पाहुण्यांचा पाहुणचारात व्यस्त होते.

अरूंद रस्ता ठरला वाहतूक कोंडीला कारण,पाटण मळवली रस्ता अरूंद असल्याने पाटण सुदामनगरी काॕर्नर ते मळवलीपर्यत वाहतूक कोंडी झाली होती. ग्रामस्थांचे करीता एकच रस्ता असून पर्यायी रस्ताचा नसल्याने राञी उशीरापर्यत वाहनचालकांना रांगा लावून पाटण गावात यायला वा जायला लागले.सुदामनगरीत अर्धवट रस्ता झाल्याने वाहनचालकांना कसरत करतच पाहुण्यांचे घरी जावे लागत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!