आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

रस्ता बंद करण्याचे विरोधात मावळातील ग्रामस्थांचे आंदोलन..

रस्ता बंद करण्याचे विरोधात औंढेखुर्द ,औंढोली ग्रामस्थ , लोहगड , घेरेवाडी ग्रामपंचायत , पवनानगर , वारू ग्रामपंचायतीचे ठराव करणार

Spread the love

सामाजिक – रस्ता बंद करण्याचे विरोधात औंढेखुर्द ,औंढोली ग्रामस्थ , लोहगड , घेरेवाडी ग्रामपंचायत , पवनानगर , वारू ग्रामपंचायतीचे ठराव करणार.

 

आवाज न्यूज : लोणावळा  प्रतिनिधी ता.१५.

औंढेखुर्द , औंढोली ग्रामस्थ यांचेसह लोहगड , घेरेवाडी ग्रामपंचायत , पवनानगर , वारू ग्रामपंचायतीचे ठराव करणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , खासदार यांना निवेदन देणार आहे, असे आज औंढेखुर्द येथे जिल्हापरिषद शाळेच्या आवारात आयोजित बैठकीत ठरले.

एमएसआरडी ए यांचेकडून लोणावळा पवनानगरला , पौडला जाणाऱ्या मार्गावर असलेल्या पुलातील वाहतूक बंद करण्यासाठी व पर्यायी आरूंद रस्ता याला विरोध करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या अलकाताई धानिवले यांचे पती लोहगड विकास सोसायटीचे चेअरमन गणेश धानिवले , सरपंच आरूण चव्हाण , उपसरपंच विकास कदम , माजी सरपंच आर्जून पाठारे , सईनाथ मांडेकर , माजी उपसरपंच निलेश नाणेकर , नंदकुमार विश्वासराव , औढे विकास सोसायटी चे संचालक सखाराम घनवट , संजय गायकवाड , व्हाईस चेअरमन सुरेश आंबेकर , तसेच मोरेश्वर मांडेकर , औंढोलीचे सदस्य नवनाथ मांडेकर , संदेश मांडेकर , नवनाथ पाठारे , पोलिस पाटील गुरूनाथ मांडेकर तसेच शिक्षक प्रतिनिधी सहादू मानकर आदी उपस्थित होते.

यावेळी सर्वांचेसमोर या भागातील सर्व ग्रामपंचायतीचेवतीने ठराव करण्यात यावे व ते ग्रामस्थांचे सह्या घेवून मुख्यमंत्री , खासदार , आमदार , उपमुख्यमंञी तसेच पीएमआरडीए ला पाठवण्याबाबत चर्चा झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!