आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

लोणावळ्यात श्री शांतीनाथ जिनालयाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त भव्यदिव्य कार्यक्रम..

लोणावळ्यात श्री शांतीनाथ जिनालयाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त ता.१९ ते ता.२६ जानेवारी पर्यत भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Spread the love

लोणावळ्यात श्री शांतीनाथ जिनालयाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त भव्यदिव्य कार्यक्रम..

आवाज न्यूज : लोणावळा ता.२२(प्रतिनिधी )

लोणावळ्यात श्री शांतीनाथ जिनालयाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त ता.१९ ते ता.२६ जानेवारी पर्यत भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी श्री तेजस्वी प्रवचनकार पूज्य आचार्य देव श्री विजय अक्षयबोधि सूरि महाराज यांचे हस्ते नवीन वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे वाजतगाजत मिरवणूकीने स्वागत व प्रारंभ झाला.
पहिल्या दिवशी प पूज्य विजय अक्षय बोधि , सुरी महाराज यांचे आगमनानंतर जैन बांधवांनी आनंदात भजन गाऊन आनंद साजरा केला.

या कार्यक्रमासाठी बांबू व लाकडाच्या सहाय्याने कपडा व
थर्माकोलचे सहाय्याने सुमारे साठ फूट उंचीचे भव्य प्रवेशद्वार व आतील मुख्य कार्यक्रमासाठी भव्य सभागृह तसेच भोजनगृह असे बांधकाम करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे निमंञक श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक देवस्थान ट्रस्ट व श्री शांतीनाथ जैन संघ आहेत.ता.२० रोजी कुंभस्थापना , दिपकस्थापना आणि क्षेत्रपाल स्थापना तसेच ज्वारारोपण मंगल विधान तसेच सकाळी दहा वाजता श्री शांतीनाथ परमात्मा यांच्या रौप्य प्रतिमेचे निर्माण गीत संगीताचे तालात झाले.

ता.२१ रोजी सकाळी सात वाजता अष्ठमंगल नवग्रह तथा दशदिग्पालपूजन , सकाळी १० वाजता अतिभव्य ऋषभ कथा , गीत , संगीत , आणि नृत्याचे तालात भगवान आदिनाथ दादा यांचा पंचकल्याणक महोत्सव झाला.
आज ता.२२ महामांगलीक श्री सुरीमंञ महापूजन तथा महापूजा चे अतिभव्य आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी सहा वाजता अतिभव्य महापूजा , प्रभुच्या स्वर्ण वर्ख की आंगी , दिपप्रज्वलन फुलांची सजावट यांचे आयोजन केले आहे.

ता.२३ श्री शांतीनाथ प्रभु यांचा जन्म महोत्सव , ता.२४ रोजी सकाळी ७ वाजता श्री शंकरस्तव महाअभिषेक होणार आहे . भिवंडी चे हार्दिक जैन यांनी या कार्यक्रमास संगीत दिले आहे.ता.२५ रोजी भव्यदिव्य रजवाडी रथयाञा बँन्ड , बग्गी , हाथी , घोडा साजन , दुपारी दोन वाजता अभिषेक व सायंकाळी साहा वाजता जिणोजिणो उडे रे गुलाल , बांदोली का सुहाना प्रसंग साजरा होईल.

ता.२६ रोजी सकाळी ७ वाजता प्रभातिया सकाळी १० वाजता सत्तरभेदीपूजा , विजयमुहूर्तावर मोठ्या दिमाखामधे ध्वजारोहण प्रसंग हेलिकॕप्टरमधून पुष्पवृष्टी असा कार्यक्रम व शाही करवा व फले चुंदडी होईल.दुपारी १ वाजता लघुशांतीस्नान महापूजन , सायंकाळी कुमारपाल महाराज बनकर यांचे हस्ते परमात्मा यांची आरती होईल.
ता.२७ रोजी मंदिराचे द्वारोद्घाटन वाजतगाजत सकाळी सहा वाजता होईल.

या कार्यक्रमास श्री विजय अक्षयबोधि सूरि महाराज यांचे मार्गदर्शन लाभले आहे.तसेच यावेळी पू.आचार्य विजय रत्नसेनसूरी महाराज , विजय युगचंद्रमहाराज पू.साध्वीजी दिव्यप्रभाश्रीजी म.सा आदी उपस्थित राहणार आहेत…
या महोत्सवाचे अनेक मंडळांच्या वतीने मोठमोठे फ्लेक्स लावून वा भव्यदिव्य असे चोकाचौकात प्रवेशद्वार उभे करण्यात आले आहेत.

तसेच शहरात आकर्षक अशा चमचमत्या पताका लावलेल्या आहेत. या धर्मनगरी हस्तिनापूर ची प्रतिमेची उभारणी श्री शिवाजी मिञ मंडळ यांचे देखरेखीखाली व यांचेवतीने करण्यात आली आहे.. या मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र जी टाटीया आणि कार्याध्यक्ष शिव आगरवाल आहेत. मंडळाचे संस्थापक प्रकाशशेठ चौव्हाण आहेत , संरक्षक चेतन चौहाण , तर सचिव राजूशेठ चौव्हाण आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!