आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारा – वर्क फॉर इक्वॅलिटी आणि एफ एम फाऊंडेशन चा अनोखा उपक्रम- “नई आशा नई दिशा”

Spread the love

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारा – वर्क फॉर इक्वॅलिटी आणि एफ एम फाऊंडेशन चा अनोखा उपक्रम- “नई आशा नई दिशा” A unique initiative of Work for Equality and FM Foundation – “Nai Asha Nai Disha” bringing out-of-school children into the stream of education.

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर, २२ एप्रिल.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, १०० पैकी फक्त ५६ मुले माध्यमिक शिक्षणापर्यंत पोहचतात या बाबतील तळेगाव आणि आजूबाजूच्या ४० गाव/वाड्या/ वस्त्या मधील १४ ते १८ वयोगटातील मुलांची काय स्थिती आहे हे पहाण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये १५२ मुलांशी व त्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला गेला व त्यातल्या पहिल्या टप्प्यात ४२ मुलांनी मुक्त शाळेतून दहावीची तयारी सुरू केली आहे. ज्यामध्ये ६०% पेक्षा जास्त मुलींचा सहभाग आहे. ही मुले संस्थेच्या अभ्यास केंद्रात गेल्या ३ महिन्यापासून नियमीत अभ्यास करत आहेत. या कामात एफ एम फाऊंडेशन यांचे सक्रीय सहकार्य लाभले आहे.

या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी लायन्स क्लब तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला एफएम फाऊंडेशन चे अधिकारी डायरेक्टर एच आर श्री मयंक गर्ग, एफएम फाऊंडेशन चे जनरल डेलिगेट्स ऑलीवर मोटे हे खास फ्रांस देशातून उपस्थित राहिले होते, तर सामाजिक कार्यकर्त्या साधना खटी व श्रीनिवास खटी देखील उपस्थित होते.

 

शाळाबाह्य मुलांचे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जाण्याचा अनुभव मुक नाटकाच्या माध्यमातून सजरीकरण हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. मुलांनी त्यांच्या शाळा सोडण्याची जी कारणे सांगितली ती आपल्या शिक्षण पध्दतीवर प्रश्न निर्माण करणारी होती. ज्यात अनेक मुलांना शाळेमध्ये फी भरता आली नाही म्हणून त्यांना शिक्षण सोडावे लागले तर वंचित मुलांना शाळांमध्ये भेदभावाची वागणून मिळत असल्यामुळे त्यांना नाईलाजाने शाळा सोडावी लागली, बाल मजुरी, बालविवाह, मुलगा मुलगी भेदभाव ही शाळा सोडण्याची प्रमुख कारणे होती. असा मुक नाटकाचा सार होता. नाटकाची रचना सायली राउधल आणि स्वागत नृत्य तृषा महेंदरकर यांनी केले.
संस्थेच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात रहाता यावे म्हणून काही महत्वाच्या गराजांचा उल्लेख केला गेला त्यात.

१) १८ वर्षापर्यंतचे शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे.
२) समाजामध्ये आणि खास करून शिक्षकांमध्ये वंचित घटकातील मुलांविषयी संवेदनशीलता वाढण्यासाठी खास कार्यक्रमांची आवश्यकता.
३) वंचित घटकातील मुलांना शाळांमध्ये समायोजन करणे सोपे जावे म्हणून मदतीसाठी शाळांमध्ये समुपदेशकाची आवश्यकता.
४) प्राथमिक शाळांमध्ये माध्यमिक वर्ग वाढविणे जेणेकरून मुलांना शाळेसाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नाही.
५) सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि वाड्या वस्त्यां पर्यन्त ही व्यवस्था पोहचेल यासाठी खात्रीशीर उपाययोजना करणे.
६) शिक्षण अधिक उल्हासी पद्धतीने देणे.
७) शाळांमध्ये वंचित मुलांसाठी विशेष वेळ देणे जेणेकरून भाषेमुळे त्यांना अभ्यास करण्यासाठी जी जास्तीची मदत आवश्यक आहे ती मिळेल.
८) शाळांमध्ये शिक्षकांची संख्या वाढविणे इत्यादिचा समावेश होता.अशी माहिती संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास यांनी दिली. कार्यक्रमात विशेष सहकार्य दिपाली देशमुख, संध्या दाभाडे, सुषमा जायगुडे, श्वेता देशपांडे, तृप्ती बनसोडे, स्वाती सूर्यवंशी, श्रद्धा तेलंगे, सूरज कांबळे, अरुणा जगदाळे, वंदना धिंडाळे, आशा शेख, शिल्पा आगळे, श्वेता पिंगळे यांचे होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!