अध्यात्मिकआपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

केअरींग हॅन्डस वारंगवाडी मावळ या सामाजिक संस्थेत, तळेगाव दाभाडे येथील मुस्लिम बांधवांनी शिरखुर्मा प्रदान करुन ईद केली साजरी.

Spread the love

केअरींग हॅन्डस वारंगवाडी मावळ या सामाजिक संस्थेत, तळेगाव दाभाडे येथील मुस्लिम बांधवांनी शिरखुर्मा प्रदान करुन केली ईद साजरी.Iftar party held at Caring Hands Warangwadi Maval, a social organization.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २२ एप्रिल.

सोहेल शिकीलकर, व त्यांच्या मिञपरिवार तर्फे सामाजिक बांधिलकी जपत हा ईदचा आगळावेगळा कार्यक्रम, ईदच्या एक दिवस आधी केअरींग हॅन्डस कलाश्रम येथे १ली ते ७ वी च्या ६५ विद्यार्थी व स्टाफसोबत  शिरखुर्मा प्रदान करुन संपन्न झाला.

 

कार्यक्रमाच्या वेळी बोलताना मा. नगरसेवक अयुब सिकिलकर यांनी उपस्थितांना रोजा या उपवासाचे महत्त्व पटवून दिले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक अध्यक्ष. बाबा मुलाणी यांनी कार्यक्रम करण्याची संधी दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले, तसेच मा नगरसेवक गोपाल परदेशी व साजिद शेख यांनी उपस्थितांना ईद व अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या.

 

सदरच्या कार्यक्रमासाठी, अय्यूबभाई शिकीलकर,गोपाल परदेशी,बाबाभाई मुलाणी,अजीज भाई शिकीलकर, प्रेमनाथ परदेशी,सोहेल शिकीलकर,मन्सूर शाह, साजिद शेख,इरफान शिकीलकर, सुफियान शिकीलकर, इजाज शिकीलकर, अय्याज़ नालबंद, अशरफ़ नालबंद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!