आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ९७ व्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने लोणावळ्यात विनम्र अभिवादन..

गोरगरीब जनतेला फळेवाटप,आरोग्य शिबीर संपन्न..

Spread the love

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ९७ व्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने लोणावळ्यात विनम्र अभिवादन ; गोरगरीब जनतेला फळेवाटप,आरोग्य शिबीर संपन्न..

आवाज न्यूज लोणावळा प्रतिनिधी , २३ जानेवारी.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने आज २३ जानेवारी रोजी लोणावळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून त्यांना आभिवादन करण्यात आले. यावेळी गोरगरीब जनतेला फळेवाटप करण्यात आली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन व अभिवादन शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक , उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आशिष तथा गबळूभाऊ ठोंबरे, महिला आघाडी सहसंपर्क संघटिका , माजी विरोधीपक्षनेत्या श्रीमती शादान चौधरी व मान्यवरांचे हस्ते झाले.यावेळी मान्यवरांचे हस्ते गरीब व गरजूंना फळे‌ वाटप करण्यात आली.

शिवसेना तुंगार्ली विभागाच्या वतीने उपशहरप्रमुख प्रविण काळे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने तुंगार्ली येथील नगरपरिषद शाळेस संगणक संच भेट देण्यात आला.
शिवसेना शहर संघटक सुभाष डेनकर यांच्या वतीने नांगर‌गाव प्रभागातील नागरिकांसाठी सोमनाथ महादेव जेष्ठ नागरिक संघाजवळ आयोजित करण्यात आले .येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले त्यामधे शंभर रूग्णांना बी पी , हृदयरोगाची तपासणी व ३९० लोकांची कान नाक व घसा तपासणी करण्यात आली.
शिवसेना खंडाळा विभागाच्या वतीने आदिवासी ठाकर वस्ती येथे खाऊवाटप व लोकोपयोगी वस्तू चे वाटप करण्यात आले.

तसेच आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील सर्व प्रभागा शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव माजी नगरसेवक निखिल कविश्वर, माणिक मराठे, शिवदास पिल्लै, मधुकर पवार, माजी नगरसेविका सिंधु परदेशी, समन्वयक जयवंत दळवी, उपशहरप्रमुख संजय भोईर, उपशहरप्रमुख मनेष पवार, युवासेना जिल्हा चिटणीस शाम सुतार, युवासेना शहर अधिकारी तानाजी सुर्यवंशी, अवजड वाहतूक सेना पुणे जिल्हा संघटक नरेश काळवीट, अवजड वाहतूक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष हेमंत मेने,‌शिववाहतुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष पंकज खोले,

सल्लागार रामभाऊ थरकुडे, मा नगरसेवक प्रकाश काळे, शंकर नाणेकर, महिला आघाडी उपतालूका संघटीका संगिता ताई कंधारे , महिला आघाडी च्या प्रभाताई आकोलकर, सुरेखा देवकर, प्रतिभा कालेकर, प्रिया पवार, अनिता गायकवाड, सुरेखा केदारी , सीमा दिघे तसेच शिवसेना विभाग प्रमुख भगवान देशमुख, रविंद्र टाकळकर, मंगेश येवले, रतन मराठे, वसंत ढोरे, संजय शिंदे, विभाग संघटक शेखर कारके, उपविभाग प्रमुख नितीन काळे, उपशहर अधिकारी ओमकार फाटक, श्रीकांत कंधारे, विभाग संघटक विनोद पिलाणे, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, शाखाप्रमुख सुनिल मराठे, शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे, शाखाप्रमुख अभिषेक इंगुळकर, शाखाप्रमुख संजय जाधव, विजय केदारी,हिंदुराज कोंडभर, उत्तम ठाकर धीरज घारे, अक्षय साबळे, यशवंत मराठे, व लोणावळा शहरातील सर्व आजी माजी पदाधिकारी नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!