आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये ‘प्रजासत्ताक दिन’ जल्लोषात साजरा..

श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद स्कूल मध्ये गुरुवार दिनांक 26/01 /2023 रोजी भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Spread the love

स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये ‘प्रजासत्ताक दिन’ जल्लोषात साजरा..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २६ जानेवारी.

श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद स्कूल मध्ये गुरुवार दिनांक 26/01 /2023 रोजी भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल चा प्रथम क्रमांक पटकावणारा गुणवंत माजी विद्यार्थी कु. अनुराग ईश्वर ढगे, श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष . संतोष खांडगे, उपाध्यक्ष. दादासाहेब उ-र्हे ,कार्याध्यक्ष. बाळासाहेब शिंदे, खजिनदार. सुदाम दाभाडे, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल च्या शालेय समिती उपाध्यक्षा.जयश्रीताई जोशी ,रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. चे अध्यक्ष रो. विन्सेंन सालेर, रो.सचिन कोळवणकर, रो.सुनील खोल्लम, रो.राहुल खळदे ,आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन करून भारत मातेचा जयघोष झाला . संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली .प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीताने केली.
कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे कु. अनुराग ईश्वर ढगे याचा स्वागतपर सत्कार श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष. संतोष खांडगे यांनी केला.उपस्थित मान्यवरांचा स्वागतपर सत्कार शालेय मुख्याध्यापिका. शमशाद शेख मॅडम यांनी केला. शाळेच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर करून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना मानवंदना दिली.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनावर वक्तृत्व, योगासने ,गीत गायन, देशभक्तीपर गीते, देशभक्तीपर नृत्य, मास पीटी, मानवी मनोरे, भारतीय कवायत, लेझीम , वेगवेगळे कवायत प्रकार नयनरम्य प्रात्यक्षिकांद्वारे सादरकेले.

प्रजासत्ताक दिना विषयी आपले मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कु. अनुराग ईश्वर ढगे यांनी संविधानाचे महत्त्व सांगून कोरोना काळात झालेली शैक्षणिक हानी भरून काढून यश संपादन करावे .विद्यालयाच्या माध्यमातून निम्न मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना उत्तम इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळत असून त्या संधीचं सोनं करून घ्यावे व उत्कर्ष साधावा असे आवाहन केले.

श्री.डोळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष.संतोष खांडगे यांनी आपल्या वक्तव्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठीच विद्यालयातून इयत्ता दहावीच्या प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून बोलावण्याची प्रथा संस्थेने सुरू केली यातून आपण प्रेरणा घ्यावी, उत्तम यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करत राहावे असा कानमंत्र दिला आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

शालेय शिक्षिका. प्रियंका मोहिते यांनी प्रजासत्ताक दिना विषयी माहिती देताना विद्यार्थ्यांनी आपण भारतीय असल्याचा अभिमान बाळगून त्याप्रती आपले कर्तव्य पूर्ण करावे असे वक्तव्य केले.कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका. शमशाद शेख मॅडम, पर्यवेक्षिक.रेणू शर्मा मॅडम,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी केले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका सौ.सुजाता गुंजाळ आणि प्रियांका पवार यांनी केले.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची गोड सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!