आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रोटरी सिटीच्या वतीने डॉक्टर नर्स व आशा वर्कर यांचा सन्मान सोहळा संपन्न..

देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी च्या वतीने तळेगाव दाभाडे शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रास ५० गाद्या चे लोकार्पण करण्यात आले.

Spread the love

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रोटरी सिटीच्या वतीने डॉक्टर नर्स व आशा वर्कर यांचा सन्मान सोहळा संपन्न..

देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी च्या वतीने तळेगाव दाभाडे शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रास ५० गाद्या चे लोकार्पण करण्यात आले.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २८ जानेवारी.

कार्यक्रमाची सुरुवात आशाताई वर्कर यांनी स्वागत गीत व समूहगीत म्हणून कार्यक्रमाला सुरुवात केली.
ध्वजारोहण प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उन्मेष गुट्टे व रोटरी सिटी चे अध्यक्ष रो दीपक फल्ले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यानिमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले डॉ उन्मेष गुट्टे,डॉ दिनेश महालिंगे सर्व नर्स ग्रामीण व शहरातील आशा वर्कर यांचा सन्मान रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी च्या वतीने रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष नितीनजी मराठे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

याप्रसंगी नगरसेविका शोभाताई भेगडे,रो गडसिंग साहेब,रो विलास काळोखे, रो दिलीप पारेख, रो रेश्मा फडतरे, रो सुरेश शेंडे,रो भगवान शिंदे ,रो संतोष परदेशी, वैभव तनपुरे व मालती फल्ले हे प्रमुख उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना नितीन मराठे यांनी रोटरी सिटी च्या वतीने तळेगाव शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रास वेळोवेळी भरघोस अशी मदत केली जाते असे मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी तळेगाव शहरातील कु आदित्य उदय गाडे या युवकाने 22 व्या वर्षी सीए ची परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
मेंबरशिप डायरेक्टर रो संजय मेहता यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच रोटरी सिटी मध्ये सदस्य असलेले डॉ सौरभ मेहता,डॉ सुरभी मेहता,डॉ मधुरा मिलिंद निकम,डॉ धनश्री काळे व डॉ रोहित मिणियार यांनी आपल्या दवाखान्यामध्ये लसीकरण केंद्र सुरू करून लसीकरणासाठी मोठा हातभार लावल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उन्मेष गुट्टे यांनी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे कौतुक करताना आम्हाला काहीही मदत लागली आणि आम्ही फोन केला की त्वरित आम्हाला रोटरी सिटी तर्फे मदत उपलब्ध करून दिली जाते त्याबद्दल रोटरी सिटी चे मानावे तेवढे आभार कमीच आहे असे गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी बोलताना रोटरी सिटी चे अध्यक्ष दीपक फल्ले यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये रोटरी सिटी नेहमीच अग्रेसर राहून काम करत आहे पुढील काळात गोरगरिबांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक्स-रे मशीन व सोनोग्राफी सेंटर सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला.

आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येक महिन्यात होणाऱ्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णास विश्रांतीसाठी २४ तास त्या ठिकाणी ठेवण्यात येते त्यावेळेला त्यांना विश्रांतीसाठी सतरंजीवर झोपावे लागत होते; ही बाब रोटरी सिटी चे प्रकल्प प्रमुख रो किरण ओसवाल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित ५० गाद्या रुग्णालयास देण्याचा निर्णय घेतला व रोटरी सिटीतर्फे या गाद्या २६ जानेवारीचा औचित्य साधून नितीन मराठे यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आल्या.आमच्या कार्याची कोणीतरी दखल घेते त्याचे समाधान आहे असे गट प्रवर्तक  अनिता भेगडे व आरोग्य केंद्रातील सिस्टर व अशा वर्कर्स यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख रो किरण ओसवाल यांनी तर आभार रो शाहीन शेख यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन रो प्रदीप टेकवडे,रो धीरज सिंग,रो विश्वास कदम,रो तानाजी मराठे,रो चेतन पटवा,रो प्रशांत ताय,रो प्रदिप मुंगसे,रो संजय चव्हाण,रो राजेंद्र कडलक,रो प्रसाद पादीर,रो सुनील महाजन,रो संजय वाघमारे,रो राकेश ओसवाल व रो म्हाळसकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!