आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय जैन संघटना विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

भारतीय जैन संघटना विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Spread the love

भारतीय जैन संघटना विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

भारतीय जैन संघटना विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी २८ जानेवारी.

भारतीय जैन संघटना विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ज्युनिअर विभागातील विद्यार्थ्यांनी शिस्तबध्द संचलनाद्वारे मानवंदना दिली.पारंपरिक पद्धतीने कुंकुम तिलक लावून आणि स्वागतगीत गायनाने पाहुण्यांचे स्वागत झाले.भव्य समर्पक रांगोळी आणि ध्वज गीताने देशभक्ती पूर्ण वातावरण निर्मिती झाली.

ध्वजवंदन विद्यालयातील माजी विद्यार्थी नायब सुभेदार सचिन आठरे पाटील आणि भारतीय जैन संघटना जेष्ठ सदस्य सुभाष ललवाणी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी भारतीय जैन संघटना पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष वीरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष शुभम कटारिया, सचिव अतुल बोरा, सहसचिव नयन शहा, तेजस कटारिया नगरसेविका सुजाता पालांडे नगरसेविका सुलक्षणाताई धर विद्यालयाचे प्राचार्य दिलीप देशमुख, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र कोकणे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय जाधव, माजी विद्यार्थी जमीर सय्यद, अरविंद भोसले, रोहित पवार,पालक संघ उपाध्यक्ष विक्रम पवार सर्व पालक प्रतिनिधी उपस्थित होते.

विद्यालयाचे प्राचार्य दिलीप देशमुख यांनी प्रास्ताविक पर भाषणात विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेल्या प्राविण्याबाबत तसेच राज्यघटनेबाबत माहिती दिली. नगरसेविका सुजाता पालांडे नगरसेविका सुलक्षणा धर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे निवृत्त नायब सुभेदार सचिन आठरे पाटील यांनी विद्यालयात शिकत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांना स्वतःतील वेगळेपण ओळखून त्यानुसार ध्येय प्राप्तीसाठी नियोजनबध्द प्रयत्न करण्याचा संदेश दिला.भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी आवश्यक विविध स्पर्धा परीक्षांची माहिती दिली. सुभाषजी ललवाणी यांनी याच विद्यालयात शिकलेला विद्यार्थी नायब सुभेदार झाला. व त्याच्या हस्ते ध्वजारोहण झाले याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो असे सांगितले. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी एकात्मतेचा संदेश देणारे सुंदर गीत सादर केले.विद्यालयात साहित्य कवायत, लेझीम, योगासने, मनोरे व देशभक्तीपर समूहगीत, समूहनृत्य तसेच नृत्यनाट्य सादरीकरण झाले. यावेळी विद्यालयातील निवेदिता धायबर,नीलिमा ब्रह्मेचा, राजश्री पवार,प्रतिभा ढोकरे ,मनोरूपा गायकवाड, वैशाली खुर्पे ,रुपाली चौधरी, शीतल परब विजया बोदडे, चंद्रकांत घोडके, लाला गिरी, धनेश पुरोहित, उमाशंकर धुमनसुरे ,वैभव केसकर, शैला बर्वे, विलास गुंजाळ, स्नेहलता वाडेकर,अपर्णा कुमठेकर तसेच प्रदीप बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

अनुजा गडगे यांनी पाहुण्यांचा परिचय व स्वागत केले. वामन भरगंडे यांनी सूत्रसंचालन केले . मुख्याध्यापक संजय जाधव यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!