आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

पुणे-लोणावळा चौपदीकरणाचा समावेश अर्थसंकल्पात रेल्वे विभागाच्या ‘पिंकबुक’ मध्ये नोंद होऊनही महाराष्ट्र शासन, रेल्वे विभागाचे दुर्लक्ष.चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार.

चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने सामाजिक संस्था, उद्योगसंस्था यांचे निवेदन व सह्यांची मोहीम राबवून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार.

Spread the love

पुणे-लोणावळा चौपदीकरणाचा समावेश अर्थसंकल्पात रेल्वे विभागाच्या ‘पिंकबुक’ मध्ये नोंद  होऊनही महाराष्ट्र शासन, रेल्वे विभागाचे दुर्लक्ष..

चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने सामाजिक संस्था, उद्योगसंस्था यांचे निवेदन व सह्यांची मोहीम राबवून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार.

आवाज न्यूज :चिंचवड प्रतिनिधी ०३ जानेवारी.

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात २ लाख ४० हजार कोटींचे नियोजन करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले. पुणे ते लोणावळा दरम्यान रेल्वेचा तिसरा व चौथा मार्ग प्रस्तावित करून उपनगरीय कॉरिडॉर विकसित करण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ५० टक्के आणि राज्य सरकारने ५० टक्के खर्च करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र रेल्वेच्या या नियोजनाला राज्य सरकारने कोविडच्या संसर्गजन्य रोगामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांमुळे भरीव निधी देण्यास नकार दिला. आता कोरोना संसर्ग संपला आहे,. शासनाने भरीव निधी देण्याची आवश्यकता आहे.

“पुणे-लोणावळा दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पिंकबुक मध्ये ८०० कोटी खर्चाचा समावेश करण्यात आला होता. तसेच या मार्गासाठी ९४३ कोटी ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. रेल्वे बोर्डाने ११ डिसेंबर २०१५ रोजी या प्रकल्पाचे काम मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनला दिले होते. त्यानंतर रेल्वे बोर्डाने २७ मे २०१६ रोजी पुणे-लोणावळा दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गासाठी प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनचे नाव घोषित केले. त्यानंतर पुणे-लोणावळा दरम्यान तिसऱ्या व चौथ्या उपनगरीय रेल्वे मार्गाच्या कामाचा २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ‘पिंकबुक’मध्ये समावेश करण्यात आला.

या दोन्ही प्रकल्पाचे काम मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनला देण्यात आले. तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल अद्ययावत करण्याच्या आणि उपनगरीय वाहतूक व वाणिज्यिक विकासाबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांनी २९ डिसेंबर २०१५ रोजी राज्य शासनाला प्रस्ताव सादर केला. त्यामध्ये पुणे ते लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या उपनगरीय रेल्वे मार्गाचे काम रेल्वे मंत्रालय व महाराष्ट्र सरकार यांच्या सहभागाने सुरू करण्यास मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी मान्यता दिल्याचे नमूद केले.पिंपरी चिंचवड महापालिका, राज्य शासनाने पुणे-लोणावळा दरम्यान ६३ किलोमीटर रेल्वे मार्गावर तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनसाठी एकूण ४३०० कोटी रूपयांच्या खर्चापैकी पुणे महानगरपालिकेने ३७५ कोटी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने २५० कोटी रूपयांचा खर्च उचलणे बंधनकारकच आहे. तो त्यांनी न दिल्यास संपूर्ण प्रकल्प गुंडाळला जावू शकतो पर्यायाने एकही नवीन लोकल पुणे-लोणावळा दरम्यान सुरू होऊ शकणार नाही, असे वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहे. दोन्ही महापालिकेने देखील आजतागायत रेल्वेला आर्थिक मदत केली नाही. पिंपरी चिंचवड शहरातील एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के रेल्वे प्रवासीयांवर अवलंबून आहेत. त्याचा विचार केला पाहिजे, याबाबत रेल्वेमंत्री, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, पुणे विभागीय व्यवस्थापकीय, खासदार श्रीरंग बारणे निवेदन दिले आहे. पुणे लोणावळा दरम्यान सध्या लोकल उशिरा धावत असून चौपदरीकरण होणे काळाची गरज असून पिंकबुक मध्ये आता भरीव निधी दिला नाहीतर चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने सामाजिक संस्था, उद्योगसंस्था यांचे निवेदन व सह्यांची मोहीम राबवून उच्चन्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे.

 

पुणे-लोणावळा दरम्यान १९७८ साली पहिली युनिट लोकल धावली, त्यानंतर १९८२, १९८५, १९८७ असे चार लोकल सुरु झाल्या. चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने १९९० पासून ते आजपर्यंत पुणे-लोणावळा दरम्यान लोकल वाढ व्हावी, रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे, यासाठी निवेदने, भेटी, आंदोलने केली. रेल्वे अधिकार्यांनी वारंवार चिंचवड प्रवासी संघाला मुंबई उपनगरमधील प्रवासीयांसाठी युनीट लोकल कमी पडतात, नवीन रेक (युनिट लोकल) उपलब्ध झाल्यास सुरु करू, निधी उपलब्ध नाही, नंतर मेल, एक्स्प्रेस गाड्यांना मार्ग उपलब्ध झाला पाहिजे, यासाठी लोकल वाढीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्गिका पुणे-लोणावळा दरम्यान असावयास हवी, असे वेळोवेळी चिंचवड प्रवासी संघाबरोबरच इतर प्रवासी संघाना कारणे सांगितले गेले., परंतु प्रत्यक्ष कृतीमात्र आजतागायत झाली नाही. याचा तीव्र निषेद करण्यात येत असून आता सादर झालेल्या पिंकबुक मध्ये भरीव निधी दिला गेला नाहीतर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. आज पुणे-लोणावळा दरम्यान विद्यार्थी, कामगार, सरकारी, निमसरकारी कर्मचारी, दुधवाले, ज्येष्ठ नागरिक, महिला, सामान्य कष्टकरी यांचे आतोनात हाल होत असून रस्ते मार्गाची वाहतूक अनेकांना आर्थिकदृष्ट्या परवडनारी नाही.
चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, पदाधिकारी मनोहर जेठवाणी, मुकेश चुडासमा, निर्मला माने, हार्दिक जानी, नयन तन्ना, इकबाल सय्यद, संदीप शहा, सुरज आसदकर, संगीता जाधव, नारायण भोसले आदी यात सहभाग घेणार आहेत. तसेच आदींनीहि सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!