अध्यात्मिकआपला जिल्हामावळ

अधिक मास (पुरुषोत्तम मास) निमित्त सत्संग म्हणून कान्हे येथे महाभारत कथा संपन्न..

महाभारत कथा बुधवार दिनांक २६.७.२०२३ ते बुधवार दिनांक २.८.२०२३ पर्यंत संपन्न झाली.

Spread the love

अधिक मास (पुरुषोत्तम मास)
निमित्त सत्संग म्हणून कान्हे येथे महाभारत कथा बुधवार दिनांक २६.७.२०२३ ते बुधवार दिनांक २.८.२०२३ पर्यंत संपन्न झाली.More Mas (Purushottam Mas)Mahabharata Katha was concluded from Wednesday 26.7.2023 to Wednesday 2.8.2023 at Kanhe as Satsang on the occasio..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी ३ ऑगष्ट.

अधिक मास महिन्यास खूप महत्व आहे.
यामध्ये अनेक ठिकाणी दान ,व्रत, वैकल्य अखंड हरिनाम सप्ताह , आणि भगवंताच्या कथा केल्या जातात .
सत्संग घडवले जातात.

या वर्षी श्रावण या पवित्र महिन्यास अधिक मास आला आहे म्हणून याचे महत्व अधिक आहे .
या निमित्ताने कान्हे मावळ येथे हभप श्री लक्ष्मण महाराज सातकर ( अध्यक्ष बाल वारकरी प्रशिक्षण कार्यशाळा) यांचे येथे भैरवनाथ भजनी मंडळ यांनी महाभारत कथा आयोजित केली होती.

कथा प्रवक्ते हभप गणेश महाराज जांभळे ( अध्यक्ष  विठ्ठल परिवार मावळ ) यांच्या सुमधुर वाणीतून कथा संपन्न झाली.त्यास संगीत साथ हभप दत्ता महाराज केदारी व हभप सोहम महाराज केदारी यांनी केलीहभप बाळासाहेब महाराज काजळे यांच्या काल्याच्या कीर्तनाचे या कार्यक्रमाची सांगता झाली.हभप प्रकाश जाधव, हभप रुपालीताई नानेकर अनेक मंडळी उपस्थित होते.या कार्यक्रमास अनेकांनी आपली उपस्थिती दाखवून या कथामृताचा आनंद घेतला.

हभप दशरथ शिंदे, हभप देवराव सातकर,हभप चंद्रकांत सातकर ,हभप संतोष सातकर, हभप शुभम कुटे, हभप काशीनाथ सातकर, हभप माणिक सातकर, हभप बबन म सातकर, हभप लक्ष्मण पारखी, हभप आप्पा महाराज जवळकर,  शाम भाऊ सातकर, रामदास भाऊ सातकर शंकर कुटे नारायण सातकर आदी करून मंडळींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून नियोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!