आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरात कचऱ्याचे साम्राज्य.

Spread the love
तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरात कचऱ्याचे साम्राज्य.Garbage empire in Talegaon Dabhade station area.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ३ जुलै.

स्टेशन भागात वतन नगर, इंद्रायणी वसाहत,जोशीवाडी,स्वप्न नगरी,मनोहर नगर,आनंद नगर,श्री समर्थ नगर आदी भागात घंटा गाड्या (कचरा गाड्या) येत आहेत परंतु वसाहती समोरील पडलेला कचरा उचलण्यासाठी, झाडांचा पालापाचोळा, झाडांच्या छाटलेल्या फांद्या,आदी कचरा उचलण्यासाठी कचरा वाहणा-या गाड्या येत नाहीत. आल्यातरी घाईत जातात. कचरा व्यवस्थित उचलणेसाठी देखरेख केली जात नाही. यामुळे तळेगाव स्टेशन परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा साचलेला आहे. तेथे पावसाचे पाणी साचत असल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.

तेथे कुत्रे,घुस,उंदीर आदी भटक्या प्राण्यांचा वावर असून तेथे उकिंड-याचे स्वरुप आलेले आहे.  साचलेल्या कच-यांमुळे डासांचे साम्राज्य झालेले आहे. यामुळे तेथील रहिवाशांच्या आरोग्यास अपायकारक झाले असून तेथे साप आदी सरपटणा-या प्राण्यांचाही वावर होत आहे. हे धोकादायक आहे. तसेच वादळ वा-यांमुळे कचरा उडून रस्त्यावर विस्कटलेल्या अवस्थेत पडत आहे. नागरिकांच्या डोळ्यात जात आहे कच-याची वाहतूक करणा-या गाड्या पाठविण्या बाबत प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

कचरा वाहणा-या गाड्या येत नसल्यामुळे नागरी वसाहतीजवळ असलेला कचरा साचत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कच-यात पाणी साचत आहे.हे रहिवाशांच्या आरोग्यास अपायकारक आहे तरी कचरागाड्या वेळचेवेळी प्रशासनाने पाठवाव्यात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!