आपला जिल्हासामाजिक

सर्व व्यावसायिकांना स्वतःची आणि कर्मचाऱ्यांची वाहने उभी करायला सुध्दा जागा रहात नाही. परंतु या सर्व व्यावसायिकांकडे एवढी सहनशक्ती.. दिलीप डोळस.

अँबुलन्सला सुद्धा रस्ता वापरता येत नाही.

Spread the love

सर्व व्यावसायिकांना स्वतःची आणि कर्मचाऱ्यांची वाहने उभी करायला सुध्दा जागा रहात नाही. परंतु या सर्व व्यावसायिकांकडे एवढी सहनशक्ती.. दिलीप डोळस.Even an ambulance can’t use the road, but all these professionals have so much stamina.. Dilip Dolas.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ११ ऑगष्ट.

सिंडीकेट बँक ते डॉ वाढोकर बांगला या रस्त्यावर अनेक दुकानं आहेत त्यात एक बँक, एक स्टेशनरी दुकान, दोन हॉस्पिटल,एक मिठाईचे दुकान , अनेक फ्लॅटधारक आणि एक कपड्यांचे एक प्रसिद्ध दुकान आहे.

एका नवीन व्यावसायिक अपार्टमेंटचे बांधकामही चालू आहे. या रस्त्यावर एका बाजुला दिवसभर चाकण एमआयडीसीत जाणारे कामगार आपली वाहनं लावून जातात.अर्धा रस्ता यातच गेला.या सर्व व्यावसायिकांना स्वतःची आणि कर्मचाऱ्यांची वाहने उभी करायला सुध्दा जागा रहात नाही.तरीही ही सर्व मालक कंपनी शांत आहेत त्यांना चीड आणि संताप येत नाही. राहिलेल्या अर्ध्या रस्त्यावर खोदकामे चालू असतात.

अँबुलन्सला सुद्धा रस्ता वापरता येत नाही.परंतु या सर्व व्यावसायिकांकडे एवढी सहनशक्ती आहे की ते सर्व “चीड आणि संताप” यापासून खूप दूर आहेत. मात्र या सर्वांनी या ठिकाणी होणाऱ्या पालिकेच्या स्वच्छतागृहाला मात्र एकी करून विरोध केला आणि ३६ लाख रु मंजुरी मिळालेल्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन झालेले काम बंद पाडले. आता या रस्त्यावर दोन वाहनं जातच नाही. तरीही हे सर्व व्यावसायिक अजूनही थंड ढिम्म आहेत.

याचा फायदा याच सर्व व्यापारी आणि दुकानदारांना झाला असता. कारण यांच्या दुकानात आणि हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना या दुकानदारांची आणि व्यावसायिकांची स्वतःची काहीच व्यवस्था नाही. या स्वच्छतागृहाचे भूमिपूजन आणि खोदाई झाल्यावर मात्र यांची एकी झाली आणि हे काम बंद त्यांनी पाडले.तीच कार्यशक्ती मात्र आपल्या समोरील रस्ता मोकळा व्हावा यासाठी हीच लोकं वापरत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!