मावळसामाजिक

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न, १०% लाभांश जाहीर..

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कर्मचारी पतसंस्थे कडून यावर्षी दहा टक्के लाभांश देण्यात आल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले.

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न, १०% लाभांश जाहीर..Annual general meeting of Talegaon Dabhade Municipal Council Employees’ Credit Institution concluded, 10% dividend declared..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर ११ ऑगष्ट.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कर्मचारी पतसंस्थे कडून यावर्षी दहा टक्के लाभांश देण्यात आल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले.तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयामध्ये झालेल्या पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याधिकारी ममता राठोड होत्या. यावेळी अध्यक्ष प्रशांत गायकवाड, उपाध्यक्ष वैशाली आडकर, सचिव रोहित भोसले, खजिनदार प्रवीण माने तसेच सर्व संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते.

संस्थेला ५७ वर्षे पूर्ण झाले असून आतापर्यंत संस्थेला सतत ‘अ’ वर्ग प्राप्त झालेला आहे. यावेळी सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. त्यास सर्व उपस्थित सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

ही पतसंस्था आपल्या हक्काची असून आपल्या अडीअडचणीला आर्थिक सहकार्य करणारी आहे, यासाठी आपण घेतलेले कर्ज विना विलंब वेळच्या वेळी परतफेड करून संस्थेला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची काळजी सर्व सभासदांनी घ्यावी असे मत उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी व्यक्त केले.

यावेळी स्वागत माजी अध्यक्ष रवींद्र काळोखे यांनी केले, प्रास्ताविक भास्कर वाघमारे यांनी केले तर सूत्रसंचालन संस्थेचे सचिव रोहित भोसले व प्रवीण माने यांनी केले तसेच आभार मुरलीधर टकले यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!