कृषीवार्तामहाराष्ट्रसामाजिक

गेवराईमध्ये गोतस्कारांना दिला दणका..

२४ गोवंश डांबून ठेवलेली गोरक्षक यांचे धाडसीपणाने पोलिसांकडून ताब्यात..

Spread the love

गेवराईमध्ये गोतस्कारांना दिला दणका; २४ गोवंश डांबून ठेवलेली गोरक्षक यांचे धाडसीपणाने पोलिसांकडून ताब्यात.In Gevrai, Gotaskars were given a bang; 24 cow guards who were holding cattle were bravely detained by the police.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, ११ ऑगष्ट.

गेवराईमध्ये गोतस्कारांना दिला दणका; २४ गोवंश डांबून ठेवलेली गोरक्षक यांचे धाडसीपणाने पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आली. गोरक्षकांच्या पुढाकाराने व दिलेल्या अचूक माहितीप्रमाणे पोलिसांनी जबरदस्त कामगिरी केल्याचे मानद पशु कल्याण आधिकरी आबा नायकवडी व आद्य गोरक्षक शिवछञपती गोरक्षा अभियानचे प्रमुख मिलींद एकबोटे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

गेवराई , बीड येथील एका गोडावूनमध्ये कत्तलीसाठी पठविणार असलेल्या गोवंश यांना डांबून ठेवल्याची माहिती काही गुप्तहेरांकडून मिळाली.यानंतर मानद पशुकल्याण अधिकारी आबा नायकवडी यांनी गेवराईमधील नागरिकांनी माहिती दिलेल्याचे पोलिसांना सांगितले. ता.१० रोजी या माहितीनुसार मध्यरात्रीनंतर बीडचे पोलिस पथक निकम गल्लीत घुसले. त्यांनी कठोरपणे तेथील गोडाऊनची तपासणी केली. त्याठिकाणी एका गोडाऊन मध्ये २४ गोवंश बांधून ठेवला होता आणि पहाटे त्यांची कत्तल होणार होती. परंतु सहाय्यक पोलिसनिरिक्षक संतोष जंजाळ यांच्या सक्षम नेतृत्वामुळे या गोडावूनमधे पोलिसांकडून छापा टाकण्यात आला. यावेळी सहा महिन्याचे लहान कालवडी , खिलारी बैल आणि गायी , बैल असे २४ गोवंश गोतस्कारांकडून पोलिसांनी ताब्यात घेतले.

तसेच त्यांनी स्वतःचा निधी खर्च करून सर्व गोवंश पहाटे ४:३० वाजता हभप पठाडे महाराज यांच्या शनिप्रसाद गोशाळेत पाठविण्यात आले.पुरुषोत्तम (अधिक) महिन्यामधील या उल्लेखनीय गोरक्षणाबद्दल गेवराईतील नागरिकांनी गोरक्षक आबा नायकवडी आणि सहाय्यक पोलिसनिरिक्षक संतोष जंजाळ यांचे अभिनंदन केले.

यावेळी सहाय्यक पोलिसउपनिरिक्षक श्री.खरात, श्री. शेळके, हवालदार श्री.शेवारे, राठोड, जावळे, पोलिसनाईक अमोल खताते, पोलिस कॉन्स्टेबल पोटे , ओहोळ आणि थोरात यांनी केलेल्या श्रमसाहसामुळेच गोरक्षण कायदा पायदळी तुडवणार्‍या गोतस्कारांना दणका बसला.
संपर्क क्रमांक आबा नायकवडी — 8888191203,
मिलिंद रमाकांत एकबोटे – ९०११८३२७११( प्रमुख संयोजक),आद्यगोरक्षक शिवछत्रपती गोरक्षा अभियान.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!