आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

वेहेरगावात २१ ;तर देवघरमधून ६ असे एकूण २७ उमेदवार रिंगणात..

प्रचार संपला ( तीन जागा बिनविरोध ..).

Spread the love

वेहेरगावात २१ ;तर देवघरमधून ६ असे एकूण २७ उमेदवार रिंगणात..काल प्रचार संपला ( तीन जागा बिनविरोध ..).

21 in Vehergaon and 6 from Deoghar, total 27 candidates in the fray; campaign ended yesterday (three seats unopposed..)

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.२५

प्रतिनिधी 

वेहेरगावच्या डोंगरावर श्री एकविरा गडावर मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्रीएकविरा देवस्थानच्या निवडणुकीत वेहेरगावात २१ ; तर देवघरमधून सहा उमेदवार रिंगणात उतरले आहेत.तीन जागा पदसिध्द आसल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

इच्छूक उभ्या असलेल्या उमेदवारांनी काहींनी भावकीसाठी रिंगणात राहून माघार दाखवत सपोट देण्याचे वचन दिले आहे. गेल्या आनेक वर्षातून प्रशासकीय राजवटीनंतर होऊ घातलेल्या देवस्थानच्या लोकप्रतिनिधी विश्वस्थ पदासाठीच्या निवडणुकीत रंगत वाढली आहे. नुकताच लोणावळा ग्रामिणचे पोलिसांकडून रूटमार्च वेहेरगाव ते श्री एकविरा पायथा काढण्यात आला.

काल प्रचार संपला सर्व बॕनर स्वतः हून काढण्यात आले आहे. अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात उतरले आसल्याने निवडणुकीचा धुरळा उडाला आहे.
देवघर येथील पदसिध्द तीन जागेपैकी दगडू ञ्यंबक देशमुख या तक्षिमेतील एका जागेसाठी एकच आल्याने माजी खजिनदार नवनाथ रामचंद्र देशमुख यांची जागा बिनविरोध झाली. पदसिध्द सरपंच यांचे जागेवर विद्यमान सरपंच आर्चनाताई संदिप देवकर यांची निवड झाली.तसेच पदसिध्द विश्वस्थ म्हणून एकच अर्ज आल्याने माजी सचिव संजय बाळकृष्ण गोविलकर यांची निवड झाली.

 

 

दररोजउर्वरित देवघर मधील नथू दगडू देशमुख या तक्षीमेमधील एका जागेसाठी तिघांनी आर्ज भरले आहेत.
राघू ञ्यंबक देशमुख व कोँडू बहिरू देशमुख या तक्षीमेमधील एका जागेसाठी तीन अर्ज भरण्यात आले आहेत.
वेहेरगावचे दोन भाविक प्रतिनिधी जागेसाठी पडवळ , बोञे , कुटे , देवकर , गायकवाड , माने आणि बोरकर तसेच देशमुख या आडनावाचे उमेदवारांनी काहींनी एकाच घरातून दोन , तीन अर्ज केल्याने २१ जणांनी रिंगणात उडी घेतली असल्याचे चिञ स्पष्ट दिसते. तसेच काहींनी एकमेकांना पाठींबा दिल्याने शनिवारी राञीपर्यत आनेक घडामोडी घडतील , मतदानाचे दिवशी ता.२६ रोजी सकाळी नऊ ते चार मतदान होईल. नंतर मतमोजणी पार पडेल.

वेहेरगावचे सुमारे १२५३ मतदार हक्क बजावतील. वेहेरगावात त्वेष्ठ भक्त निवास येथे ता.२६ रोजी सकाळी ९ ते ४ मतदान होईल. निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून एस.एस .पारच यांनी मतदार याद्या प्रसिध्द करणे व मतदार यंञणा राबविणे हे काम शासनाचेवतीने हाती घेतले आहे.गेली अनेक वर्षे वडगाव न्यायलयाचे न्यायाधीश , धर्मादाय आयुक्त व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचेकडे असलेला प्रशासकीय कारभार आता श्रीएकविरा देवस्थानचे नवनिर्वाचित विश्वस्थ पाहतील , त्यासाठी रविवारी मतदान होत आहे. लोणावळा उपविभागीय पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून व रॕपिड अॕक्शन फोर्स कडून वेहेरगाव ते पायथा मंदिरापर्यत रूटमार्च काढण्यात आला.मतदान निर्भयपणे व्हावे , हा यामागे उद्देश आहे….

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!