मावळसामाजिक

‘कुठल्याही शहराचे वैभव हे त्या शहराच्या सांस्कृतिक विकासावर ठरते’. सचिन ईटकर..

सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय गुणवंत शिक्षक सन्मान व निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ...

Spread the love

कुठल्याही शहराचे वैभव हे त्या शहराच्या सांस्कृतिक विकासावर ठरते’. सचिन ईटकर ; सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय गुणवंत शिक्षक सन्मान व निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ७ ऑक्टोबर.

एखाद्या शहराचा विकास म्हणजे तेथे किती इमारती, किती आर्थिक सुबत्ता आहे यावर त्या शहराचा विकास नसून त्या शहरांमध्ये सांस्कृतिक वळण किती चांगले आहे. साहित्य, कला, संस्कृती, नाट्य या सगळ्यांचा वावर त्या शहरांमध्ये कसा आहे यावर त्या शहराचे वैभव ठरत असते. असे मत महाराष्ट्र राज्याचे आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार.सचिन ईटकर यांनी मांडले.

याप्रसंगी बोलताना सचिन ईटकर पुढे म्हणाले की,भारत देशाच्या प्रगतीमध्ये सगळ्यात जास्त वाटा शिक्षकांचा आहे. चांगली पिढी घडवण्याचे काम शिक्षक करीत अशा शिक्षकांचे संस्थेच्या वतीने कौतुक होत आहे याचा अभिमान वाटतो.

तळेगाव दाभाडे,येथील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या वतीने गुणवंत शिक्षक सन्मान व निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला.याप्रसंगी ते व बोलत होते. सेवाधाम ट्रस्टचे अध्यक्ष, नाट्य परिषदेचे अध्यक्ष. सुरेश धोत्रे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डॉ. किरण देशमुख, डॉ. वर्षा वाढोकर, ज्येष्ठ कवी उद्धव कानडे, कवी पुरुषोत्तम सदाफुले, महेंद्र भारती शाहीर प्रभाकर वाघोले आदी मान्यवर उपस्थित होते.

तळेगावातील साहित्य प्रेमी रसिकांसाठी सेवाधाम ट्रस्ट नेहमीच दर्जेदार कार्यक्रम आयोजित करत असते आणि या पुढेही करणार आहे असे मनोगत सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालयाचे अध्यक्ष मा.सुरेश धोत्रे यांनी व्यक्त केले.

 

प्रास्ताविक व स्वागत सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालयाच्या सचिव डॉ.वर्षाताई वाढोकर यांनी करून सेवाधाम ट्रस्टच्या उपक्रमांची माहिती दिली तर समारंभाचे उत्तम निवेदन तळेगाव च्या नृत्य अभ्यासक डॉ.मीनल कुलकर्णी यांनी केले.

निबंध स्पधेत ५ वी ते ७ वी या गटामध्ये ८९ व ८ वी ते १० वी या गटात ८३ विद्यार्थ्यांचा तर खुल्या गटात १० स्पर्धकांचा सहभाग होता सहभाग होता,या निबंध स्पर्धांचे परीक्षण मा.सचिन लांडगे ,मा.नयना ताई डोळस (प्राथमिक विभाग), श्रीकृष्ण पुरंदरे, जी.पी.गिरमकर, व विश्वास देशपांडे (माध्यमिक विभाग) जयश्रीताई जोशी (खुला गट) यांनी केले.  छाया सांगळे (सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे) व अश्विनी काळे (कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कुल तळेगाव दाभाडे यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

समारंभ यशस्वी होण्यासाठी ग्रंथालयाच्या डॉ.मलिंद निकम,अमित बांदल,ग्रंथपाल बाळासाहेबघोजगे,राजेश बारणे,संजय भागवत,तानाजी मराठे आणि ग्रंथालयाच्या सर्व सेवकांनी परिश्रम घेतले.

  • निबंध स्पर्धेचा निकाल –

प्राथमिक विभाग -५ वी ते ७ वी

प्रथम क्रमांक – समृद्धी गावडे, सरस्वती विद्या मंदिर, विषय – नको तो मोबाईल

द्वीतीय क्रमांक –अथर्व हरवंदे, कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कुल.- विषय –पुस्तक माझा मित्र

उत्तेजनार्थ – समीक्षा घोडके – विषय- नको तो मोबाईल – नवीन समर्थ विद्यालय.

उत्तेजनार्थ – प्रणिता थोरवे – विषय- पुस्तक माझा मित्र – सरस्वती विद्या मंदिर

उत्तेजनार्थ – सोनाल औताडे – विषय- पुस्तक माझा मित्र – नवीन समर्थ विद्यालय

उत्तेजनार्थ – वैष्णवी महाजन – विषय- माझा आवडता कवी – रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन

माध्यमिक विभाग -८ वी ते १० वी

प्रथम क्रमांक – अनुप्रिया लबडे, सरस्वती विद्या मंदिर, विषय – माझी आवडती कवियत्री

द्वीतीय क्रमांक – भूमिका कडू, सरस्वती विद्या मंदिर.- विषय – माझा आवडता कवी.

उत्तेजनार्थ – सृष्टी कोंडे – विषय- माझा आवडता कवी – सरस्वती विद्या मंदिर.

उत्तेजनार्थ – वैष्णवी कुंभार – विषय- माझा आवडता कवी – आदर्श विद्या मंदिर.

उत्तेजनार्थ – परम कुंभार – विषय- माझा आवडता कवी – सरस्वती विद्या मंदिर.

उत्तेजनार्थ – आर्या बोत्रे – विषय- माझा आवडता कवी – सरस्वती विद्या मंदिर.

खुला गट
प्रथम क्रमांक – राजश्री बनसोडे – विषय- ऑन लाईन शिक्षण काळाची गरज आहे का ?

द्वीतीय क्रमांक – राजेंद्र गुर्जर – विषय- शब्दांचे सामर्थ्य – यशवंत नगर

उत्तेजनार्थ – स्वाती तांबिरे – विषय- शब्दांचे सामर्थ्य – यशवंत नगर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!