आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेत जान्हवी सोलकर प्रथम.

Spread the love

समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेत जान्हवी सोलकर प्रथम.Janhvi Solkar stands first in Samarth Shalaka Scholarship Examination.

आवाज न्यूज :   तळेगाव दाभाडे, वार्ताहर, ३ मार्च.

तळेगाव दाभाडे, येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ व कै. ॲड. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत, जान्हवी सोलकर हिने प्रथम क्रमांक , शुभम माळी याने, द्वितीय क्रमांक, तर शरण्या हुलावळे हिने तृतीय क्रमांक पटकावला.

अशी माहिती संस्थेचे सचिव व प्रकल्प प्रमुख संतोष खांडगे , प्रकल्प सहप्रमुख एस. एन. गोपाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेचा सराव व्हावा, परीक्षेची भीती दूर व्हावी, प्रोत्साहन मिळावे, शाळांच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारावा,समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत,शिक्षणाची संधी मिळावी.

आदी उद्देशांनी समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्याचे संतोष खांडगे यांनी सांगितले.
संस्थेच्या इयत्ता ९वीतील ७५३ विद्यार्थ्यांपैकी १५५ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरले आहेत.
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र समारंभपूर्वक देण्यात येणार असल्याचे खांडगे यांनी सांगितले.

 

समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल याप्रमाणे:
प्रथम – जान्हवी मंगेश सोलकर (श्री एकविरा विद्या मंदिर,कार्ला), व्दितीय -शुभम संताजी माळी (ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर,तळेगाव दाभाडे), तृतीय -शरण्या विष्णू हुलावळे(श्री एकविरा विद्या मंदिर,कार्ला),
उत्तेजनार्थ: राधिका राजेश
कामनवार (प्रगती विद्या मंदिर,इंदोरी), तेजस दत्ता बैकर (श्री एकविरा विद्या मंदिर,कार्ला).

शाळेनुसार प्रथम क्रमांक (प्रोत्साहनपर)
प्रथम – पायल सोमनाथ भुरुक(नवीन समर्थ विद्यालय, तळेगाव दाभाडे),
प्रथम – रचना पंडित हेलगंड(श्री छत्रपती विद्या मंदिर, कान्हे)
प्रथम -हर्षल सुनील चव्हाण (पवना विद्या मंदिर, पवनानगर)समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेचे समन्वयक म्हणून उमेश इंगुळकर, सुदाम वाळुंज, पांडुरंग पोटे, भाऊसाहेब आगळमे, संजय वंजारे, कैलास पारधी, राम कदमबांडे आदींनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!