आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

सुप्रसिद्ध ज्येष्ठ नेत्रतज्ञ मधुसूदन झवर लिखित “मधु संचय”- या पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न !

डॉक्टर मधुसूदन यांनी प्रास्ताविकात मधुसंचय या आपल्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या निर्मिती मागील आपली भूमिका स्पष्ट केली.

Spread the love

सुप्रसिद्ध ज्येष्ठ नेत्रतज्ञ मधुसूदन झवर लिखित “मधु संचय”- या पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न !The grand release ceremony of the book “Madhu Samakam” written by the well-known senior ophthalmologist Madhusudan Zawar is over!

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, ५ मार्च.

व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन केल्यानंतर प्राजक्त प्रकाशन संस्थेचे जालिंदर चांदगुडेंनी सर्व उपस्थिताचे स्वागत केले. डॉक्टर मधुसूदन यांनी प्रास्ताविकात मधुसंचय या आपल्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या निर्मिती मागील आपली भूमिका स्पष्ट केली. सर्वप्रथम- ज्यांनी 80% या पुस्तकाच्या लिखाणासाठी जे अपार कष्ट घेतले त्या आपल्या कै. आप्पा कुलकर्णी या सन्मित्राप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली.

या लिखाणात कुठलीही आत्मप्रौढी नाही, तर नवीन पिढीला मानवीमूल्य जपण्याचा वसा देण्याचा हा माझा अल्पसा हा प्रयत्न आहे हे आपल्या मनोगतात त्यांनी पुढे विशद केले. विविध क्षेत्रातील आपले मित्र_ आपल्या परिवारवर प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट आणि खास करून आपली पत्नी डॉक्टर. राजकुवर यांच्याविषयीही डॉक्टरांनी ऋण व्यक्त केले. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या स्वागत- सत्कारानंतर पद्मविभूषण डॉक्टर के एच संचेती सरांच्या शुभहस्ते- आणि सर्व मान्यवरांच्या साक्षीनं मधुसंचय या पुस्तकाचा — अतिशय प्रसन्नतेची अनुभूती देणारा प्रकाशन सोहळा संपन्न करण्यात आला.

डॉक्टर संचेतीसर आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले की- पुण्याच्या बी.जे. मेडिकलला मी विद्यार्थ्यांना शिकवत असताना माझा असंख्य विद्यार्थ्यांशी संपर्क आला, त्यातील डॉक्टर मधुसूदन हा माझा विद्यार्थी खास करून लक्षात राहण्याच कारण म्हणजे – त्याच असलेलं वेगळेपण;  नेत्रतज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर त्याही पलीकडे जाऊन त्याने अनेक शिबीरे घेतली. मोतीबिंदू बरोबरच तिरळेपणाच्या शस्त्रक्रियेचं कौशल्य प्राप्त करून रुग्णांची सेवा केली, याबरोबरच क्रीडा क्षेत्रातील अत्यंत सन्मानाचा समजला जाणारा श्री छत्रपती शिवाजी अवॉर्डचा तो स्वतः मानकरी होऊन थांबला नाही तर- त्याने अनेक विद्यार्थ्यांना हाच सन्मान मिळवून दिला. म्हणूनच मी त्याला विसरू शकत नाही.

यानंतर पुढील वक्ते– डॉक्टर संजय चोरडिया- प्राध्यापक मिलिंद जोशी-सिक्कीमचे माजी राज्यपाल.श्रीनिवास पाटील सर आणि समारंभाचे अध्यक्ष. ज्येष्ठ साहित्यिक- सकाळ- लोकमतचे माजी मुख्य संपादक- आदरणीय विजय कुवळेकरसर या– सर्व वक्त्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने जवळजवळ दोन तास संपूर्ण समारंभ चैतन्यदायी ठेवला.

प्रत्येक वक्त्यांनी डॉक्टर. मधुसूदन यांच्या जीवन शैलीच्या विविध पैलूवर आपापल्या विशिष्ट शैलीतून प्रकाश टाकला! तळेगावचे लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी आणि लायन. अनिता बाळसराफ या उभयतांच्या रसाळ निवेदनाने प्रकाशन सोहळा एका विशिष्ट उंचीवर नेला गेला. सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर सचिन काबरा यांच्या- समर्पक शब्दातून त्यांनी व्यक्त केलेल्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली! सभागृहातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एक– आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अनुभूती देणारा हा प्रकाशन सोहळा — पाहिल्याचे समाधान दिसत होत.. हेच समारंभ यशस्वी झाल्याचं द्योतक होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!