आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

महिला दिनानिमित्त अनोखी भेट..

तळेगावात प्रथमच अग्निशामक दलातर्फे महिला व नागरिकांसाठी माहिती सत्र संपन्न.

Spread the love

महिला दिनानिमित्त अनोखी भेट.तळेगावात प्रथमच अग्निशामक दलातर्फे महिला व नागरिकांसाठी माहिती सत्र संपन्न.A unique gift on the occasion of Women’s Day. For the first time in Talegaon, an information session was held for women and citizens by the fire brigade.

आवाज न्यूज, तळेगाव दाभाडे वार्ताहर, ८ मार्च.

तळेगावात प्रथमच अग्निशामक दलातर्फे महिला व नागरिकांसाठी माहिती सत्र आयोजित करण्यात आले. तळेगाव दाभाडे म्हस्करनीस २ कॉलनी चौराई माता प्रतिष्ठान या मैदानात एमआयडीसी चे  दोरुगडे सर यांनी कुठल्याही प्रकारची आग लागल्यास, कार्य तत्परता घेउन आग आटोक्यात कशी आणली पाहिजे याविषयी माहिती दिली.

यावेळेस कॉलनीतील नागरिकांनी त्याचा लाभ घेतला.मनकर्णिका महिला महासंघाचे अध्यक्षा व संस्थापिका वीणाताई करंडे यांनी या स्तुत्य कार्यक्रमासाठी आपले योगदान दिले. 

यावेळी वीणाताई यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आत्तापर्यंत वेगवेगळे उपक्रम राबवून महिला दिन साजरा केला गेला जसे की आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकिन वाटप, वृक्षारोपणाचे महत्व सांगण्याकरता वृक्ष वाटप, कष्टकरी महिलांना साडी वाटप, सी  आर पी एफ च्या जवानांच्या पत्नीचे सत्कार, विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या व आदर्श माता यांचे सत्कार असे विविध कार्यक्रम महिला दिनानिमित्त राबवले गेले.परंतु हा अतिशय उपयुक्त माहितीपूर्ण कार्यक्रम राबवून महिला दिनाची आपण ही अनोखी भेट देत आहोत.

 

सुरेश शिंदे व नवनाथ शेवाळे बाळासाहेब करंडे उमेश जगतकर, रोहित हातेकर यांच्या हस्ते एमआयडीसी फायर ब्रिगेडचे  दोरुगडे व साळुंखे सर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कॉलनीतील कुमारी जानवी आंबेकर हिने मिस मावळ स्पर्धा जिंकल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला. यावेळी महिला वर्गाबरोबर सुट्टीचा दिवस असल्याकारणाने पुरुषवर्गाने सुद्धा या सत्राचा लाभ घेतला.लक्ष्मण जाधव, पशुपती सिंग, बाबुराव पाटील, आनंद पाटील हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!