आरोग्य व शिक्षण

ज्या घरात आई आहे तिथे भाकरी कधीच कमी पडणार नाही – शारदा मुंडे

Spread the love

चांदखेड : “ज्या घरातील आई जो पर्यंत मुलगा घरी आल्यावर घराची कडी वाजत नाही तोपर्यंत ती झोपत नाही म्हणुन ज्या घरात आई आहे तिथे भाकरी कधीच कमी पडणार नाही असे भावनिक आवाहन मी सावित्री फुले बोलते च्या व्याख्याता शारदाताई मुंडे यांनी केले.”क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मावळ तालुका माळी समाजोन्नती मंडळ व माळी समाज बांधव चांदखेड यांच्या वतीने चांदखेड येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात मुंडे बोलत होत्या.

या वेळी प्राचार्य दत्तात्रय बाळसराफ, माळवाडीच्या सरपंच पुनम आल्हाट, माजी जिल्हा परिषद सदस्या अरुणाताई माळी, सुमित्रा जाधव, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगरसेविका मंगलताई जाधव, मावळ तालुका समता परिषदेच्या महिला अध्यक्षा स्नेहलता बाळसराफ, माजी सरपंच धनंजय विधाटे,दिलीप विधाटे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभुळकर, माजी उपसरपंच विजय फुले ,मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक सुदेश गिरमे, माजी सरपंच सदानंद टिळेकर, रामचंद्र जगताप, बाळासाहेब बोरावके, जगन्नाथ शेवकर , संतोष तांबे, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप गायकवाड, कैलास यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंडे पुढे म्हणाल्या की वाईट गोष्टी सोडून द्या समोरची व्यक्ती कितीही चुकीचे बोलत असला ते बरोबर आहे असे म्हटल्यास कधीच वाद होणार नाही ज्या घरात ८०-९० वर्षांची आई जगली आहे त्या सुनेला शंभर टक्के मार्क दिले पाहिजे कारण मुलगा बाहेर गेल्यावर सुन सामर्थ्य व बळावर तीची काळजी घेते असे सांगून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बोलते यावर व्याख्यान दिले.

यावेळी पाचाणे येथील आभाळमाया वसतिगृहाच्या प्रमुख शांताबाई येवले यांना मंडळाच्या वतीने आदर्श माता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, सकाळी झालेल्या कोविड लसीकरण ३८० जणांना मोफत लसिकरण करण्यात आले.

यावेळी कोरोनाच्या काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या सौ छाया भाऊ रायकर- अंगणवाडी सेविका,सौ लीला किसन घारे- अंगणवाडी सेविका,सौ मंगल संतोष म्हसूडगे- आशा वर्कर ,श्रीमती राणी राजू शिंदे- आशा वर्कर, एकनाथ भुजबळ (संचालक तळेगाव विविध कार्यकारी सोसा) यांचे सन्मान करण्यात आला यावेळी लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात आलेल्या पाच विजेत्यांना बक्षीसाचे वाटप करण्यात आले.

स्वागत माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय माळी यांनी केले तर प्रास्ताविक स्नेहलता बाळसराफ यांनी केले, सुत्रसंचालन शिक्षिका प्रज्ञा माळी यांनी तर आभार नवनाथ शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन माळी समाजोन्नती मंडळ व माळी समाज बांधव चांदखेड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!