आरोग्य व शिक्षणदेश विदेशमहाराष्ट्र

देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा रंगला..

आकर्षक फुलांची सजावट विद्युतरोषणाई यांनी याञेवर कळस चढविला..

Spread the love

देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा रंगला; आकर्षक फुलांची सजावट विद्युतरोषणाई यांनी याञेवर कळस चढविला..Dehut Jagadguru Saint Tukaram Maharaj Vaikunthagaman ceremony was held; Attractive floral decorations culminated in Vidyut Roshanai.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर. देहु प्रतिनिधी, १० मार्च.

तुकाराम ! ! तुकाराम ! ! नाम घेता कापे यम ! ! असे आभंग महिला , वारकरी यांच्या मुखामधे होते.. देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा रंगला. हजारो वारकरी , महिला वारकरी , मुले , मुली आबालवृध्द यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे दर्शनाचा लाभ घेतला. मुख्य विठ्ठल रूक्मिणी मंदिरात , दर्शनासाठी , वीणा मंडपात पालखीचे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांचे आगमन होत होते. महाद्वाराजवळून दर्शन मंडपात रांगाचरांगा पहायला मिळाल्या.

वैकुंठगमन मंदिरात , नांदुरकीचे झाडाजवळ , तसेच महाराजांचे घरी आणि गाथा मंदिरात प्रचंड गर्दी पहायला मिळाली. शेकडो लहान मोठ्या दुकानदार , उन्हाचा तडाखा असल्यामुळे आईस्क्रीम वाले , उसाचा रस , थंडगार मँगो , पायनापल सरबते पिण्यासाठी लोकांनी गर्दी केलेली दिसून आली.येथील गाथा मंदिरासमोर सभामंडप वारकऱ्यांनी खचाखच भरला होता.संत तुकाराम महाराज शिळा मंदिराबाहेर , भाविकांकडून रांगा लावून दर्शनाचा लाभ घेत होते.यावेळी मंदिरावर , वैकुंठगमन मंदीर , शिळा मंदीर आणि गाथा मंदीर तसेच राम लक्ष्मण सीता मंदिरातदेखील भाविकांकडून दर्शनासाठी गर्दी केली होती.

 

 

तसेच येथे फुलांची आकर्षक सजावट केल्याची पहायला मिळाली. गाथा मंदिरासमोर सभामंडप भाविकांकडून खचाखच भरला होता. येथे ह.भ.प.वैराग्यमुर्ती मारूतीबुवा कु-हेकर महाराज यांचे हजारो वारकऱ्यांचे समोर प्रवचन झाले.येथे फुलांच्या सजावटीत संत तुकाराम महाराज यांच्या जीवनातील प्रसंग आकर्षक रितीने साकारलेले पहायला मिळाले .इंद्रायणीनदी पाण्यात आंघोळ करण्यास व हात , पाय ,  धुण्यास कपडे धुण्यासाठी भाविकांकडून गर्दी करण्यात येत असल्याचे दिसले.

 

संत तुकाराम महाराज वैकुंठगमन मंदिरात श्रीकृष्ण राधा मंदिरात भाविकांकडून रांगाचरांगा रांगा लावून दर्शनाचा लाभ घेण्यात येत होता..येथे महाराष्ट्र शासनाचे पोलीस भाविकांनी शांततेत रांगा लावून दर्शन घेण्यासाठी बंदोबस्तावर होते.येथून पञकारांना दर्शनासाठी मधून ते सोडत नव्हते.डोक्यावर पोलिसांची टोपी नसल्याने या  त्यामुळे या पोलिसांवर कडक कारवाई करणे गरजेचे असल्याचे काही पञकार व नागरिकांकडून सांगण्यात आले.

मोराची चिंचोली , आळंदी रोड , देहूफाटा , येलवाडी चाकणरोडला वाहणांमधून हजारो वारकरी आले व परत गेले.
शेकडो दुकानदारांनी खेळणी , प्रसाद , पेढे , तुळशीमाळा , खाद्यपदार्थ , तसेच संसोपयोगी लाटणे , पळपट , कढई आदीच्या विक्रीसा ,लहान मुला , मुलींचे खेळण्यांची दुकाने लावली होती.त्यात लोक खरेदी करत होते..
संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर , शिळा मंदिर , तसेच देऊळवाडा येथे फुलांनी सजविलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी परिसर भक्तीमय बनला होता.

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!