आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

अपूर्ण रस्त्याचे काम असताना द्रूतगतीमार्गाच्या खालील पुल बंद केल्याने..

Spread the love

अपूर्ण रस्त्याचे काम असताना द्रूतगतीमार्गाच्या खालील पुल बंद : केल्याने औंढेखुर्द , औंढोली , दुधिवरे , लोहगड , पवनानगर कडे जाणाऱ्या ग्रामस्थ , पर्यटकांचे हाल थांबवण्याची आमदारांकडे केली ग्रामस्थांनी   मागणी.The following bridges of the expressway were closed due to incomplete road work: The villagers approached the MLAs to stop the plight of tourists going to Aundhekhurd, Aundholi, Dudhivare, Lohgad, Pavananagar.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, १४ मार्च.

अपूर्ण काम आसताना द्रूतगतीमार्गाच्या खालील पुल बंद केला असून त्यामुळे औंढेखुर्द , औंढोली , दुधिवरे , लोहगड , पवनानगरला जाणाऱ्या ग्रामस्थ , पर्यटकांचे हाल होत आहेत.येथे रोजच एक आपघात होत आहे. त्यामुळे पुलाचे काम तातडीने सुरू करावे , अशी औंढेखुर्द , औंढोली येथील महिला व ग्रामस्थांनी केली आहे.

लोणावळा ते औंढेखुर्द , पवनानगर रस्त्यावर आसलेला द्रूतगतीमार्गाच्या खालील पुलातील रस्ता बंद केला.त्यामुळे शाळेत जा ये करणाऱ्या “वाहनचालकांचे हाल होतात. यामुळे पुलाचे कामाचा पत्ता नाही , अन् पूलामधे असलेला मार्ग बंद केल्याने शालेय विद्यार्थांना , वाहनचालक , कामगार , बाजार हाटासाठी जा ये करणारांना ञास होत आसून आय आर बी कंपनी दखल घेईल का ? असा प्रश्न नागरिकांकडून व महिलांचे वतीने विचारण्यात आला.

आमदारांनी लवकरच मार्ग काढू , असे आश्वासन महिलांना व ग्रामस्थांना दिले.आज गावभेटीसाठी मावळचे आमदार यांनी औंढोली व औंढेखुर्द गावाला भेट दिली . यावेळी औढोलीतील पांधण रस्ते खुले करण्याबाबत ग्रामस्थांतर्फे निवेदन देण्यात आले , तसेच ग्रामस्थांकरिता हे रस्ते चालू करावेत , अशी मागणी केली. यावेळी महिलांचे प्रश्न ऐकून घेत त्यांनी रस्ते खुले करण्याबाबत शासनाला, आधिकारी यांना सांगू, असे आश्वासन दिले.

औंढोलीत मारूती मंदिरास आरसीसी मधे सभामंडप व कळसाचे मंदिराचे कामाबाबत निधी देण्यात येईल , असे आमदार शेळके म्हणाले. यावेळी असंख्य महिला , व ग्रामस्थ , ग्रामपंचायत सदस्या ज्योती जांभूळकर , औंढेखुर्द चे सरपंच अरूण चव्हाण,माजी उपसरपंच निलेश नाणैकर , तसेच साईनाथ मांडेकर , मधुकर मांडेकर , मोरेश्वर मांडेकर , महिला बचतगटाच्या सविता मांडेकर , कविता मांडेकर , संगीता मांडेकर आदी उपस्थित होते.

औंढेखुर्द येथे श्रीराम व लक्ष्मण व जानकी आणि मारूती मंदिरात झालेल्या आढावा बैठकीत गावाचा पाणी प्रश्न दिवाळी पर्यत सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच येथे पुलाचे काम तातडीने सुरू करून वहातुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी आदेश देतो , तसेच श्री नागनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देणार , असे आश्वासन दिले.

यावेळी श्री राम मंदिरामधे आमदार श्री सुनिलआण्णा शेळके यांचा कामगारनेते एकनाथ शिर्के यांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी नेपाळपर्यत सायकल घेऊन जाणाऱ्या तरूणांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्या राजश्रीताई राऊत यांचे पती व माजी ग्रामपंचायत सदस्य संतोषभाऊ राऊत यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी कुसगावचे ग्रामपंचायतीचे सदस्य प्रदिप कोकरे ,विशाल तिडके , नितीन मोरे , औंढेखुर्द चे सरपंच आरूण चव्हाण , माजी उपसरपंच निलेश नाणेकर , उद्योजक साईनाथ मांडेकर , नारायणभाऊ आंबेकर , ग्रामस्थ मारूती आंबेकर , राजेश केदारी , माजी सदस्य सखाराम घनवट , मृदूंगाचार्य तुकाराम घनवट , ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!