आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

श्री भैरवनाथ देवस्थान उत्सवानिमित्त गावठाण येथे पं.आतुलशास्ञी भगरे गुरूजी यांची श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ ऐकण्यासाठी गर्दी ..

Spread the love

श्री भैरवनाथ देवस्थान उत्सवानिमित्त गावठाण येथे पं.आतुलशास्ञी भगरे गुरूजी यांची श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ ऐकण्यासाठी गर्दी ..On the occasion of Shree Bhairavanath Devasthan Utsav, a crowd gathers to listen to Srimad Bhagavat Katha Jnanayajna by Pt.Atulshasthan Bhagare Guruji at Gavthan.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी  १५ मार्च.

श्री भैरवनाथ देवस्थान उत्सवानिमित्त गावठाण येथे प.आतुलशास्ञी भगरे गुरूजी यांची श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ ऐकण्यासाठी भाविकांकडून गर्दी होत आहे. रोज सकाळी ८ ते दुपारी ४ वा .पर्यत संगीत गाथा पारायण ह.भ.प.गणेशमहाराज कार्ले यांचे नेतृत्वाखाली होत आहे.ता.१५ रोजी ह.भ.प.गणेशमहाराज कार्ले यांचे सकाळी १० ते १२ पर्यत काल्याचे कीर्तन होईल.

ता.८ रोजी श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ ता.१४ पर्यत सुरू आहे.या कथेचे सौजन्य राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास भिकू बडेकर , शालीनी अमित गवळी , आमृता आमोल ओंबळे , दामोदर आ.चव्हाण व दत्ताञेय रा.हारपुडे , यांचेकडून देण्यात आले आहे.

भैरवनाथ उत्सव समितीचे अध्यक्ष आमोलभाऊ विठ्ठल ओंबळे , उपाध्यक्ष फ्रकाश मनाजी हारपुडे , खजिनदार माजी नगराध्यक्ष आमित प्रकाश गवळी , सहखजिनदार संजय कि.हारपुडे , सेक्रेटरी राजेश तु.तिकोणे , सहसेक्रेटरी भगवान पां.पांगारे , सहसेक्रेटरी खंडू वि.कंधारे आशी कार्यकारीणी आहे.

पं.आतुलशास्ञी भगरे यांनी सुश्राव्य अशी श्रीमदभागवत कथा सांगितली . भगवान कृष्णाच्या जन्मापासून त्याचा मुलगा प्रदुम्न आणि नातु आनिरूध्द यांचे विवाहाची कथा सांगितली.

सुरेख गायक यांचे गायनाचार्य व वादकाचे साथीत कथा सांगण्यात आली.यावेळी पंचायत समिती माजी सभापती राजाराम शिंदे , बाळासाहेब काजळे , राजू दळवी , पांडुरंग हार्डे , आदीसह शेकडो मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!