आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

लोककला क्षेत्रात वगसम्राट दादु इंदुरीकर हे दीपस्तंभासारखे आदर्शवत होते”.. जेष्ठ साहित्यिक व लोककला अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ..

Spread the love

लोककला क्षेत्रात वगसम्राट दादु इंदुरीकर हे दीपस्तंभासारखे आदर्शवत होते”.. जेष्ठ साहित्यिक व लोककला अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ.. In the field of folk art, Vagsamrat Dadu Indurikar was an ideal like a lamppost”.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १६ मार्च.

“लोककला क्षेत्रात वगसम्राट दादु इंदुरीकर हे दीपस्तंभासारखे आदर्शवत होते”असे गौरवोद्गार जेष्ठ साहित्यिक व लोककला अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ यांनी व्यक्त केले.पद्मश्री शा.साबळे आणि वगसम्राट दादु इंदुरीकर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधुन मुंबई विद्यापीठ लोककला अकादमी आणि महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई विद्यापीठातील परिसंवादात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्रा.डाॕ.प्रकाश खांडगे होते.ओव्हाळ पुढे म्हणाले की,दादु इंदुरीकरांनी जनरंगात न्हाऊन निघणारा तमाशा बाज पहिल्यांदाच बंदिस्त थिएटरांत आणला.ही कला पांढर पेशांच्या माजघरापर्यंत गेली.शहरी प्रेक्षक आणि नागरी प्रेक्षकांनी त्यास भरभरुन दाददिली.

गर्दीचे सारे उच्चांक मोडले गेले.या कलावंताने मराठी रंगभुमीही वर्धीष्णु केली आणि चित्रपटातील मराठी सोंगाड्यालाही आनोखा बाज दिला.दादा कोंडके त्यांना गुरु मानत.त्यांच्या लकबी,हजरजबाबीपणा,वाक्याची फेक सार काही अभुतपुर्व होत.आज सोंगाडपणा लोप पावत चाललाय.हसणं गुदमरुन गेलय.समाजजीवनांत नव सोंगाडपण उभ रहाव अशी अपेक्षा आहे.

दि.१३ व १४ मार्च २०२३ रोजी राष्ट्रीय चर्चासत्र व परंपरा महोत्सवाच उद्घाटन अभिनेते आदेश बांदेकर यांच्या हस्ते झाले.यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री वामन केंद्रे ,विद्यापीठाचे प्रकुलगुरु डाॕ.अजय भामरे,कुलसचिव डाॕ.सुनिल भिरुड,प्रदिप कामथेकर,ज्येष्ठ रंगकर्मी विजय कदम,जयमाला ईनामदार,वसंत अवसरीकर यांसह इंदुरीकर प्रतिष्ठानचे सहसचिव लोककला आभ्यासक सोपान खुडे,कोषाध्यक्ष अॕड.रंजना भोसले.उपाध्यक्ष संजय चव्हाण,राजेंद्र इंदुरीकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!