आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

अंनिसचे राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियान सुरू..

Spread the love

अंनिसचे राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियान सुरू Annis statewide membership registration drive started.

आवाज न्यूज : गुलामअली भालदार,  चिंचवड प्रतिनिधी  १७ मार्च.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ‘राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियान’ सुरू आहे, यामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सामिल होऊन अंनिसचे सभासद व्हावे असे आवाहन अंनिसच्या कार्यकर्त्या शुभांगी घनवट यांनी केले आहे.

अंनिस संघटनेची भूमिका सांगताना अंनिसचे कार्यकर्ते विश्वास पेंडसे म्हणाले की, अंनिस ही महाराष्ट्रातील संत समाजसुधारक यांचा धर्मचिकित्साचा वारसा पुढे चालवते. व्यक्तीच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करुन समाज विवेकी बनवणे हे अंनिसचे अंतिम ध्येय आहे. अंनिसचा कोणत्याही देवा धर्माला विरोध नसून देवा धर्माच्या नावावर मानसिक, आर्थिक शोषण करणाऱ्या कुप्रवृत्तीला विरोध आहे. अंनिस मध्ये काम करणेसाठी कोणत्याही जाती धर्माची,आस्तिक नास्तिक अशी कोणतीही अट नाही. भारतीय संविधानावर विश्वास असणारा प्रत्येक जण अंनिस मध्ये सहभागी होऊ शकतो.

या अंनिस सभासद नोंदणी अभियानांतर्गत मार्च, एप्रिल आणि मे २०२३ या तीन महिन्यात राज्यभरात अंनिसचे ५००० सभासदांची नोंदणी केली जाणार आहे.ज्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सामाजिक कार्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी अंनिसच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क करा. अंनिसचा छापील सभासद नोंदणी फॉर्म भरून अंनिसचे सभासद व्हा.
आपल्या जिल्ह्यात अंनिस सभासद फॉर्म विश्वास पेंडसेकाका , यांचेकडे उपलब्ध आहेत.

 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सामाजिक कार्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी पिंपरी चिंचवड येथे विश्वास पेंडसेकाका आणि शुभांगी घनवट, निगडी येथे अशोक जाधव सर, बाणेर येथे अलका जाधव आणि श्रीनिवास गडकरी तर हिंजवडी येथे सामंत याचेशी संपर्क साधावा. त्याचे संपर्क अनिस ग्रंथ दिंडी पारंबी से.28/378 प्राधिकरण पुणे ४११०४४ कार्यालय फोन नंबर २०/२७६५४१२८आकुर्डी, पुणे यांचेकडे उपलब्ध आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!