महाराष्ट्र

सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने कवयित्री संमेलनाचे आयोजन करत आगळ्यावेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा..

ति'च्या कविता हे कवयित्री संमेलन रविवार दिनांक १२ मार्च रोजी ग्रंथालयाच्या प्रांगणात संपन्न..

Spread the love

सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने कवयित्री संमेलनाचे आयोजन करत आगळ्यावेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला.Women’s Day was celebrated in a different way by organizing poetess meeting on behalf of Sevadham Trust Library and Free Library.

 आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १७ मार्च.

ति’च्या कविता हे कवयित्री संमेलन रविवार दिनांक १२ मार्च रोजी ग्रंथालयाच्या प्रांगणात संपन्न झाले. या संमेलनात मावळ तालुक्यात सह आजूबाजूच्या परिसरातील १५ कवियत्रींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कवितांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्याची उत्तम जाण असणाऱ्या रेडिओलॉजिस्ट दीपाली झंवर तर प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम व्यवसायिक सीमा कदम उपस्थित होत्या.

 

ग्रंथालयाचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती शाखा, मुंबई च्या संचालक मंडळ पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनच्या प्रस्तावाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाच्या सचिव डॉ वर्षा वाढोकर यांनी करताना ग्रंथालयाच्या उभारणी पासून ची माहिती, ग्रंथालयात चालवले जाणारे विविध उपक्रम याची थोडक्यात माहिती देत वाचन संस्कृती जपण्यासाठी सर्वांनी ग्रंथालयाचे सभासद होण्याचे आवाहन केले. ग्रंथालयाच्या ज्येष्ठ सल्लागार जयश्री जोशी यांनी महिला कवयित्रीची परंपरा आणि बहिणाबाईंच्या कविता याविषयी याविषयी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्या सीमा कदम यांनी स्त्रीचे महत्त्व विशद करताना स्त्रीच्या अंगात असलेली क्षमता कशी वाढवावी याविषयी मार्गदर्शन केले. तर दीपाली झंवर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जीवनाचा आनंद कसा वाढवावा त्याचबरोबर शरीर स्वास्थ आणि मनाचे स्वास्थ कसे जपावे याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात सहभागी कवयित्रींना कविता संग्रह आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मीनल कुलकर्णी तर कवयित्री संमेलनाचे सूत्रसंचालन पूजा डोळस यांनी केले. यावेळी ग्रंथालयाचे ग्रंथपाल बाळासाहेब घोजगे सदस्य राजेश बारणे, ग्रंथालयाचा कर्मचारी वर्ग व परिसरातील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्याच कवयित्री संमेलनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर वेगवेगळे साहित्यिक उपक्रम, वाचक कट्टा, कवयित्रींसाठी अशाच प्रकारे व्यासपीठ यापुढेही उपलब्ध व्हावे अशी इच्छा उपस्थित त्यांनी व्यक्त केली.
या कवयित्री संमेलनाचे संयोजन डॉक्टर वर्षा वाडकर, डॉ मीनल कुलकर्णी, पूजा डोळस यांनी केले होते तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष सुरेश धोत्रे यांचा संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!