आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

लोणावळा नगरपरिषदेतर्फे चौकाचौकात सुशोभिकरण माझी वसुंधरा अंतर्गत उपक्रम.!

लोणावळ्यातील चौकाचौकात बसविलेल्या या आकर्षक वस्तूंमुळे चौकाला शोभा आली आहे.

Spread the love

लोणावळा नगरपरिषदेतर्फे चौकाचौकात सुशोभिकरण माझी वसुंधरा अंतर्गत उपक्रम.!An initiative under Chakachaukaran Majhi Vasundhara by Lonavla Municipal Council.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर,लोणावळा प्रतिनिधी. १९ मार्च.

माझी वसुंधरा २०२३ स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत लोणावळा नगरपरिषद कार्यालयातर्फे नववर्षांच्या निमित्ताने रायवूड येथील श्री रायवूड गणेश मंडळाचे रस्त्याचे बाजूला वेस्टमधून बेस्ट या उपक्रमांतर्गत टाकावू लोखंड वापरून मोराची आकृती साकारली आहे. तसेच लोहगड दर्शन उद्यानासमोर स्वातंञ्यवीर सावरकर यांच्या नावाने असलेल्या चौकात आज बनवलेली नकली तोफ बसविण्यात आली आहे. ही वस्तूही टाकावुतून टिकाऊ बनवलेली आहे, असे दिसते.

 

लोणावळ्यातील चौकाचौकात बसविलेल्या या आकर्षक वस्तूंमुळे चौकाला शोभा आली आहे.
भांगरवाडी येथे भुयारी गटाराचे कामासाठी रस्त्याचे खोदकाम केले होते , त्यावर खडीकरण केले आहे.पण रस्त्याची नीटपणे सारख्या प्रमाणात खडी , डांबर न टाकल्याने काही ठिकाणी उंच सखल झाला आहे , त्यामुळे या ठिकाणी मोठी वर्दळ असूनही वाहनचालकांना कसरत करीतच जा ये करावी लागते. याबाबत भाजपचे, माजी नगरसेवक देविदास कडू यांनी नगरपरिषदेकडे लक्ष वेधून  रस्त्याचे काम नीट न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!