आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या ५व्या वर्धापनदिनानिमित्त कीर्तनसेवा , मावळरत्न पुरस्कारांचे मान्यवरांचे हस्ते वाटप.

Spread the love

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या ५व्या वर्धापनदिनानिमित्त कीर्तनसेवा , मावळरत्न पुरस्कारांचे मान्यवरांचे हस्ते वाटप..On the occasion of 5th anniversary of Maval Taluka Warkari Sampradaya Mandal, Kirtanseva, distribution of Maval Ratna awards by dignitaries..

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, १९ मार्च.

 

गुढीपाडव्यानिमित्त मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या ५व्या वर्धापनदिनानिमित्त वैराग्यमुर्ती ह.भ.प.गणेशमहाराज कार्ले यांची कीर्तनसेवा , मावळरत्न पुरस्कारांचे वितरण ता.२२ रोजी सेवाधाम येथे होणार आहे, मृदूंगाचार्य भाऊसाहेब आगळमे , प्रवचनकार , कीर्तनकार पांडुरंग महाराज गायकवाड , गायनाचार्य आरूण महाराज येवले यांचा मावळरत्न पुरस्काराचे मानकरी यांत समावेश आहे.

 

मावळ तालुका वारकरी सांप्रदायाचे संस्थापक आध्यक्ष नंदकुमार भसे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
यावर्षी मावळरत्न पुरस्काराचे मानकरी ह.भ.प.पांडुरंग महाराज गायकवाड (शास्ञी ) ,कांब्रे नामा , ह.भ.प.भाऊसाहेब महाराज आगळमे (मृदूंगाचार्य -गुरूजी ), ह.भ.प.आरूण महाराज येवले (गायनाचार्य -गुरूजी ), ह.भ.प.बाळकृष्ण महाराज कोंडे (डोणे),ह.भ.प.खंडुजी धंद्रे (कल्हाट )आणि ह.भ.प.माऊली महाराज कदम (घोणशेत), असे आहेत.

सकाळी १० ते १२ दिपप्रज्वलन झाल्यानंतर ह.भ.प.वैराग्यमुर्ती गणेशमहाराज कार्ले यांचे कीर्तन होईल.
मावळरत्न पुरस्काराचे वितरण आमदार सुनिलआण्णा शेळके ,माजी राज्यमंञी बाळाभाऊ भेगडे , भाजप तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे , शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेशशेठ गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते सुधीर पारीटे , अॕड.चंद्रकांत शिंदे , सेवाधाम च्या संचालिका ,प्रकल्प आधिकरी स्वातीताई वेदक आणि मान्यवर उपस्थित राहतील.

भंडारा डोंगर दशमी समिती अध्यक्ष ह.भ.प.बाळासाहेब काशिद, श्री पोटोबा महाराज देवस्थान अध्यक्ष सोपानराव म्हाळसकर , मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे कार्याध्यक्ष शिवाजी पवार तसेच नितीन घोटकुले,( संस्थापक , गोधाम ) यांचे हस्ते होईल.दुपारी १२ ते साडेबारा कीर्तनानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा अहवालवाचन होईल. त्यानंतर पुरस्काराचे वितरण होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!