आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अविज फाउंडेशनच्या माध्यमातून, मावळामध्ये ३७ शाळांमध्ये २००० घरट्यांचे वाटप.अविनाश नागरे

२० मार्च जागतिक चिमणीदिवस."चिमणी वाचवा व चिमणी संवर्धन" या मोहिमेला आमचा सलाम..

Spread the love

अविज फाउंडेशनच्या माध्यमातून, मावळामध्ये ३७ शाळांमध्ये २००० घरट्यांचे  वाटप.अविनाश नागरे Through Avij Foundation, distribution of 2000 nests in 37 schools in Mawla.Avinash Nagre..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २० मार्च.

” तीन वर्षापूर्वी तळेगाव दाभाडे रोटरी सिटी व अविज फाउंडेशन च्या माध्यमातून मावळात चिमणी संवर्धनाचे काम चालू केले होते.शहरी भागामध्ये कृत्रिम घरट्यांचा वापर कसा करावा व ती कशा पद्धतीने बनवावी…

आतापर्यंत  मावळ लोणावळा, खंडाळा, कोल्हापूर, सांगली तसेच व अवीज फाउंडेशन व तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आपण यावर्षी व या महिन्यात मावळामध्ये ३७ शाळांमध्ये २००० घरट्यांचे वाटप व शाळेतील शिक्षकांची कार्यशाळा घेऊन करून विद्यार्थ्यांकडून योग्य पद्धतीने त्यांच्या घरामध्ये चिमणीची घरटी बसून घेतली व या माध्यमातून आत्तापर्यंत या तीन वर्षात ५५०० चिमण्यांची पिल्ले आपल्या घरट्यांमधून बाहेर पडल्याची नोंद झाली आहे. चिमणी संवर्धनाला तळागाळातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले.

 

अविज फाउंडेशनच्या, माध्यमातून चिमणी विषयी लोकांमध्ये जनजागृती करून तिचे निसर्गामध्ये महत्त्व काय? हे लोकांच्या लक्षात आले. तसेच पक्षांना पाणी अन्नधान्याचे नियोजन कशा पद्धतीने असावे याचे मार्गदर्शन केले.

या गोष्टींचाच आदर्श घेऊन चिमण्यांविषयी चाललेली चळवळ बघून विविध संस्थांनी आज तळेगाव मध्ये मोठ्या प्रमाणात चिमणी संवर्धनाचे कार्यक्रम चालू केले या गोष्टीचा आम्हास अभिमान वाटतो की विविध संस्थांच्या “चिमणी वाचवा व चिमणी संवर्धन” या मोहिमेला आमचा सलाम, असे म्हणत मावळातील पक्षी मित्रांना २० मार्च जागतिक चिमणी दिवसाच्या अविनाश नागरे यांनी शुभेच्छा दिल्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!