आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा उत्सव २०२३.तळेगांव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.

गुढीपाडवा, बुधवार, दि. २२ मार्च २०२३ ते शनिवार, दि. २५ मार्च २०२३ या काळात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

Spread the love

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा उत्सव २०२३.तळेगांव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे.Festival of Village Deity Shri Dolasnath Maharaj 2023. Talegaon Dabhade, T. Maval, Dist. Pune.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २१ मार्च.

ग्रामस्थांच्या व हितचिंतकांच्या सहकार्याने, नवतरुण कार्यकर्त्याच्या संकल्पनेने “ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा उत्सव शके १९४४ चैत्र शु. १ गुढीपाडवा, बुधवार, दि. २२ मार्च २०२३ ते शनिवार, दि. २५ मार्च २०२३ वा काळात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

पहाटे ०५.०० वा. “श्रींचा अभिषेक व पूजा” व सायंकाळी ०५.०० वा. : “ श्री नाथांच्या पालखीचे ग्रामप्रदक्षिणेसाठी प्रस्थान होणार आहे.

 

गुढीपाडव्याच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे मानले जाणारे तळेगांवचे जागृत देवस्थान “ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा उत्सव” होत असतो. सद्यस्थितीत मंदिराचे बऱ्यापैकी काम पूर्णत्वाच्या स्वरुपात आले आहे. तसेच पुणे जिल्ह्यामधील मावळ तालुक्यातील तळेगांव दाभाडे या शहरामध्ये अनेक मल्लांनी देखील कुस्ती क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेले आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे “बैलगाडा शर्यत” हा देखील आहे. त्यामुळे “ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर नवनिर्माण समितीच्या” मार्गदर्शनाखाली आणि “ग्रामदेवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या” वतीने या वर्षी “बैलगाडा शर्यत” आणि “भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान” भरविण्याचे निश्चित केले आहे.

 

महाराष्ट्राच्या पारंपारिक तांबड्या मातीच्या या रांगड्या खेळांना गती मिळून आजच्या तरुण पिढीतील नवोदित गाडामालकांना (शेतकरी) व मल्लांना प्रोत्साहन मिळण्यासाठी तसेच या कार्यातून बैलगाडा व कुस्ती क्षेत्राचा प्रचार व प्रसार होण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्न करीत आहोत. तरी आपण या उत्सवातील छबीना पालखी, बैलगाडा शर्यत, कुस्ती मैदान, भारुड, नोकनाट्य तमाशा, आर्केस्ट्रा व इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती डोळसनाथ महाराज उत्सव समिती तर्फे करण्यात येत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!