आरोग्य व शिक्षण

प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा

Spread the love

चिंचवड : येथील चिंचवड मधील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा झाला.

हिंदी दिवसाच्या निमित्ताने ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दर्शविला.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनाने झाली. हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रवींद्र निरगुडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या प्रा. सुशील भोंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या भाषणातून हिंदी विषयाचे महत्त्व सांगत हिंदी भाषेचा उद्धव विकास सविस्तरपणे मांडला. देशविदेशामध्ये हिंदीच्या माध्यमातून होत असलेले अध्यापन नमूद केले.हिंदी दिवसाच्या निमित्ताने ’हिंदी दोहा कथन एवं विश्लेषण’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास कमला शिक्षण संकुलाचे सचिव डॉ. दिपक शाह, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्रचार्या प्रा.डॉ. वनिता कुर्‍हाडे या सर्वांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर, कर्मचारी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी भारती व आदित्य रंजन या विद्यार्थ्यांनी केले व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अर्चना गांगड यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!