आरोग्य व शिक्षण

पिंपळे सौदागरमध्ये ‘कोव्हिड लसीकरण आपल्या दारी’ मोहिमेचा प्रारंभ

उन्नती सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांना मोफत लस

Spread the love

पिंपळे सौदागर :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेली अतोनात जीवितहानी लक्षात घेता तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडून वर्तविण्यात आलेल्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून घेण्याच्या उद्देशाने उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांसाठी ‘लसीकरण आपल्या दारी’ ही मोहीम काल 25 जुलै रोजी राबविण्यात आली.

फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे व अध्यक्षा कुंदाताई भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने पिंपळे सौदागर परिसरातील सोसायट्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. माजी नगरसेवक शंकर जगताप व नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

सदर मोहिमेंतर्गत नागरिकांना अत्यंत सवलतीच्या दरात फक्त ७८० रुपयांमध्ये कोव्हिडशिल्ड ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे परिसरातील दिव्यांग नागरिकांसाठी मात्र ही लस मोफत देण्यात आली. या वेळी सफाई कामगार ,घरकाम करणाऱ्या महिला इतर गरजुंना मोफत देण्यात आली व यावेळी लस घेणाऱ्या प्रत्येक नागरिकांना फाउंडेशनच्या वतीने एक वृक्षाचे रोप भेट देण्यात आले.या लसीकरण उपक्रमात 172 नागरिकांनी सहभाग नोंदवला .

त्यावेळी फाउंडेशन च्या अध्यक्षा ,सौ कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या कि या उपक्रमाचे मुख्य कारण म्हणजे अंध-अपंग,दिव्यांग व घरकाम करणाऱ्या महिला असतील तर अश्या गरजू नागरिकांना मोफत ठेवण्यात आले , व ज्येष्ठ नागरिकांना जाण्या येण्याचा त्रास होऊ नये व इतर नागरिकांना देखील जवळ लस भेटावी म्हणून आम्ही हा उपक्रम राबविला.व यापुढे आम्ही असे समाजपयोगी उपक्रम घेत राहू .व जसे सोसायटीचे चेअरमन व सहकारी या उपक्रमाचा लाभ आपल्या सोसायटीतील नागरिकांना व्हावा व प्रत्येक नागरिकांच्या हितासाठी उपक्रमात आमच्या सोबत आले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व इतर सोसायटी मधील चेअरमन असतील यांनी देखील सहभाग दाखवला तर उन्नती फाउंडेशन प्रत्येक सोसायटी मध्ये हा उपक्रम नागरिकांच्या हितासाठी घेण्यास तयार आहे जरी ज्या सोसायटी मध्ये हा उपक्रम घ्याचा असेल त्या सोसायटीचे चेअरमन असतील त्यांनी उन्नति सोशल फाउंडेशन कार्यालय येथे संपर्क करावा .

या मोहिमेसंदर्भात बोलताना शंकर जगताप म्हणाले की, आज संपूर्ण देश कोरोनाशी दोन हात करत आहे. आणि कोरोनाला हरविण्यासाठी सर्व नागरिकांचे लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या उन्नती सोशल फाऊंडेशनने पुढाकार घेऊन ही लसीकरण मोहीम राबविली हे अत्यंत कौतुकास्पद असून शहरातील इतर संघटना व नेत्यांनीही अशाप्रकारे लसीकरण मोहीम राबविल्यास पिंपरी चिंचवड शहर कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही.
व सोसायटीचे चेअरमन श्री विजय भांगरे म्हणाले कि ज्या ज्येष्ठ नागरिकान लसीकर केंद्र दूर असल्यामुळे जाता येत नाही त्यामुळे या उपक्रमाचा. खूप फायदा आमच्या सोसायटीला झाला उन्नती फाउंडेशन याआधीही समाजपयोगी उपक्रम राबवायची व यावेळीही ते पुढे आले त्याबद्दल मी उन्नती फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ कुंदाताई संजय भिसे यांचे सोसायटी तर्फे खूप आभार मानतो व यापुढेही आम्ही त्यांचा सोबत आहोत .

त्यावेळी अतुल पाटील ,राजेंद्र जयस्वाल ,विकास काटे ,विवेक भिसे ,शुभम ननावरे ,योगेश बाविस्कर ,अल्को सोसायटीचे चेअरमन विजय भांगरे , सेक्रेटरी लक्ष्मण जाधव ,राहुल सावजी ,अक्षय कुलकर्णी व इतर नागरिक उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!