महाराष्ट्र

आता धुरळा ग्रामपंचायत निवडणुकांचा,   राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर..

ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार असुन, २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

Spread the love

आता धुरळा ग्रामपंचायत निवडणुकांचा,   राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर..

आवाज न्यूज :  वार्ताहर,  मुंबई. १० नोव्हेंबर..

राज्यातील  ७७५१  ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा लवकरच उडणार आहे. आज राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणुकांसंबंधीत नोटीस ही १८ नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार जारी करतील. दरम्यान १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तारीख राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केली आहे. याचबरोबर दुसऱ्या टप्प्यातही ७ हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा जाहीर झाल्या आहेत.

ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून २० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर२०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी होईल.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: अहमदनगर- २०३, अकोला- २६६, अमरावती- २५७, औरंगाबाद- २१९, बीड- ७०४, भंडारा- ३६३, बुलडाणा- २७९, चंद्रपूर- ५९, धुळे- १२८, गडचिरोली- २७, गोंदिया- ३४८, हिंगोली- ६२, जळगाव- १४०, जालना- २६६, कोल्हापूर- ४७५, लातूर- ३५१, नागपूर- २३७, नंदुरबार-१२३, उस्मानाबाद- १६६, पालघर- ६३, परभणी- १२८, पुणे- २२१, रायगड- २४०, रत्नागिरी- २२२, सांगली- ४५२, सातारा- ३१९, सिंधुदुर्ग- ३२५, सोलापूर- १८९, ठाणे- ४२, वर्धा- ११३, वाशीम- २८७, यवतमाळ- १००, नांदेड- १८१ व नाशिक- १९६. एकूण- ७७५१..

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!