ताज्या घडामोडी

सैनिक वेल्फेअर असोसिएशन वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न…

Spread the love

टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे
दिनांक 02/10/2022 रोजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन चा वर्धापन दिन संपन्न झाला.टाकळीवाडी सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष ऑनरेरी कॅप्टन रमेश निर्मळे यांनी स्थापन केली.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री राजू जूगळे व सौ रूपाली जुगळे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. भवानीसिंग घोरपडे सरकार समाजसेवक हे होते. इचलकरंजी चे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार होते .शिरोळ तालुका महिला संघटना अध्यक्ष श्रीमती नंदा खरात या होत्या. श्री सुरेश बदामे, माजी सुभेदार केंदबा कांबळे महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष , दादा खोत, गोपाल निर्मळे, महादेव बदामे, समीर आरकाटे व इतर माजी सैनिकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
सैनिकांच्या महिलांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महिला संघटना कार्यकारणी निवड करण्यात आली अध्यक्ष सौ रुक्मिणी निर्मळे, उपाध्यक्ष आशा बदामे, सचिव अंकिला आरकाटे, खजिनदार सौ जयश्री निर्मळे, सल्लागार सौ रुपाली जुगळे, संघटक पुनम निर्मळे यांची निवड करण्यात आली.
आभार माजी सैनिक लक्ष्मण निर्मळे यांनी केले यावेळी गावचे सरपंच मंगल बिरणगे गावातील सर्व आजी-माजी सैनिक ,सर्व ग्रामस्थ सर्व पदाधिकारी पस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!